पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील श्री केदारनाथ धाम येथे दर्शन घेतले आणि पूजा केली
गाभाऱ्यात रुद्राभिषेक केला
पंतप्रधानांनी आदिगुरू शंकराचार्य यांच्या समाधी स्थळाला भेट दिली
मंदाकिनी आस्थापथ आणि सरस्वती आस्थापथाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला
केदारनाथ धाम प्रकल्पातील श्रमिकांशी संवाद साधला
Posted On:
21 OCT 2022 12:17PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केदारनाथला भेट दिली आणि श्री केदारनाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. पारंपारिक पहाडी पोशाख परिधान करून पंतप्रधानांनी मंदिरातील गाभाऱ्यात रुद्राभिषेक केला आणि नंदीच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली.


पंतप्रधानांनी आदिगुरु शंकराचार्य यांच्या समाधी स्थळालाही भेट दिली तसेच मंदाकिनी आस्थापथ आणि सरस्वती आस्थापथ येथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.

त्याचबरोबर पंतप्रधानांनी केदारनाथ धाम प्रकल्पातील श्रमिकांशीही संवाद साधला.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि उत्तराखंडचे राज्यपाल, सेवानिवृत्त जनरल गुरुमित सिंग, यावेळी पंतप्रधानांच्या सोबत होते.
केदारनाथ हे हिंदूंचे एक महत्वाचे देवस्थान आहे. या भागात हेमकुंड साहिब हे शीखांना वंदनीय असणारे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे.
धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांच्या ठिकाणी भाविकांना पोहोचण्यासाठी आणि तेथील मूलभूत पायाभूत सोयी सुधारण्यासाठी या क्षेत्रात हाती घेण्यात आलेले जोडणी प्रकल्प पंतप्रधानांची वचनबद्धता अधोरेखित करतात.
***
GopalC/Madhuri/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1869881)
Visitor Counter : 236
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam