आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.50 कोटी मात्रांची संख्या केली पार


12 ते 14 वयोगटातील 4.12 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 25,037

गेल्या 24 तासात 2,119 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.97%

Posted On: 21 OCT 2022 9:40AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.50 (2,19,50,97,574) कोटींची संख्या ओलांडली आहे.   

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.12 (4,12,13,682) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415365

2nd Dose

10120325

Precaution Dose

7065418

FLWs

1st Dose

18437100

2nd Dose

17719682

Precaution Dose

13740139

Age Group 12-14 years

1st Dose

41213682

2nd Dose

32297012

Age Group 15-18 years

1st Dose

62000806

2nd Dose

53297822

Age Group 18-44 years

1st Dose

561399480

2nd Dose

516256768

Precaution Dose

100258819

Age Group 45-59 years

1st Dose

204046588

2nd Dose

197063007

Precaution Dose

50598006

Over 60 years

1st Dose

127680189

2nd Dose

123211367

Precaution Dose

48275999

Precaution Dose

21,99,38,381

Total

2,19,50,97,574

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 25,037 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.06% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे.  गेल्या 24 तासांत 2,582 रुग्ण कोविडमुक्त  झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची  एकूण संख्या (महामारीच्या सुरूवातीपासून ) वाढून 4,40,84,646 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 2,119 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 1,88,220 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.96 (89,96,27,428) कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.97% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.13% आहे. 

***

GopalC/SampdaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869830) Visitor Counter : 137