भारतीय निवडणूक आयोग

मतदार साक्षरता आणि जागरूकतेबाबतच्या सर्वोत्कृष्ट मोहिमेसाठी राष्ट्रीय प्रसारमाध्यम पुरस्कार 2022

Posted On: 20 OCT 2022 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2022

 

मतदार साक्षरता आणि जागरूकतेबाबतच्या सर्वोत्कृष्ट मोहिमेसाठीच्या राष्ट्रीय प्रसारमाध्यम पुरस्कार 2022 साठी भारतीय निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यम संस्थांकडून प्रवेशिका मागवल्या आहेत. मुद्रित माध्यमे, टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडिओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाईन (आंतरजाल)/सोशल मीडिया अशा प्रत्येक गटासाठी एक, असे एकूण चार पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेबद्दल मतदारांना साक्षर करून तसेच मतदान आणि नोंदणीची प्रासंगिकता आणि महत्त्व याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करून मतदारांना निवडणूकीत सहभागी होण्यास प्रोत्साहन देणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

सन्मानपत्र, मानचिन्ह आणि रोख पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप असते. 25 जानेवारी, 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिनी हे पुरस्कार प्रदान केले जातील.

निकष

खालील निकषांवर ज्युरी प्रवेशिकांचे मूल्यांकन करतील:

  • मतदार जनजागृती मोहिमेचा दर्जा
    • व्याप्तीचे प्रमाण
    • जनतेवर परिणाम झाल्याचा पुरावा
    • सुलभ निवडणुकांबद्दल जागृतीपर कव्हरेज
    • इतर कोणतेही संबंधित घटक

प्रवेशिका पाठविण्यासाठी अटी

प्रवेशिका म्हणून पाठविलेले साहित्य संबंधित कालावधीत प्रकाशित किंवा प्रसारित केलेले असावे.

मुद्रित प्रवेशिकांमध्ये पुढील बाबी समाविष्ट असल्या पाहिजेत:

  1. संबंधित कालावधीत केलेल्या कामाचा सारांश, ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश असावा
    1. बातम्यांची /लेखांची संख्या
    2. एकूण मुद्रण क्षेत्र चौ. सेमी. मध्ये
  2. पीडीएफ सॉफ्ट कॉपी किंवा संबंधित वेब पत्त्याची लिंक किंवा वृत्तपत्र/लेखांची पूर्ण आकाराची फोटोकॉपी/मुद्रित प्रत;
  3. थेट सार्वजनिक सहभागासारख्या इतर कोणत्याही उपक्रमांचा तपशील
  4. इतर कोणतीही माहिती

टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक) आणि रेडिओ (इलेक्ट्रॉनिक) प्रवेशिकांमध्ये पुढील बाबी समाविष्ट असणे आवश्यक आहे:

  1. संबंधित कालावधीत राबविलेल्या मोहिमेची/कामाची थोडक्यात माहिती, ज्यात पुढील बाबी समाविष्ट असाव्यात.
    1. प्रसारणाचा अवधी, वारंवारीता आणि प्रसारणादरम्यानच्या प्रत्येक स्पॉटची एकूण वेळ अशा सर्व तपशिलासह साहित्य (सीडी, डीव्हीडी किंवा पेन ड्राईव्हमध्ये)
    2. सर्व स्पॉट्स/बातम्यांच्या एकूण प्रसारण वेळेची बेरीज
    3. मतदार जागृतीबाबत वृत्तचित्र किंवा कार्यक्रमाचा समावेश असणारी सीडी किंवा डीव्हीडी किंवा पेन ड्राईव्ह किंवा इतर डिजिटल माध्यमे तसेच कार्यक्रमाचा कालावधी, प्रसारण तारीख, वेळ आणि वारंवारता यांचा तपशील
  2. थेट सार्वजनिक सहभागासारख्या इतर कोणत्याही उपक्रमांचा तपशील
  3. इतर कोणतीही माहिती

ऑनलाईन (आंतरजाल)/सोशल मीडिया प्रवेशिकांमध्ये पुढील बाबींचा समावेश अनिवार्य आहे:

  1. संबंधित कालावधीत केलेल्या कामाचा सारांश, त्यात पोस्ट/ ब्लॉग/ मोहिमा/ लेख इत्यादींची संख्या समाविष्ट असावी.
  2. संबंधित लेखांची पीडीएफ सॉफ्ट कॉपी किंवा संबंधित वेब पत्त्याची लिंक:
  3. थेट सार्वजनिक सहभागासारख्या इतर कोणत्याही उपक्रमांचा तपशील
  4. ऑनलाइन उपक्रमांचा प्रभाव (तपशील)
  5. इतर कोणतीही माहिती

महत्वाचे

  1. इंग्रजी/हिंदी व्यतिरिक्त इतर भाषेत सादर केलेल्या प्रवेशिकेसोबत इंग्रजी भाषांतर आवश्यक आहे, ते नसल्यास प्रवेशिका नाकारली जाईल.
  2. ज्युरी प्रवेशिकेमधील केवळ पहिल्या दहा मिनिटांचा कार्यक्रम विचारात घेऊ शकतात, हे प्रवेशिका सादर करणार्‍या प्रवेशकर्त्यांनी लक्षात घ्यावे.
  3. आयोगाचा निर्णय अंतिम असेल आणि कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. याबाबतचे सर्व अधिकार आयोगाकडे राखीव आहेत.
  4. प्रवेशिकेमध्ये प्रसारमाध्यम संस्थेचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक आणि ईमेल असणे आवश्यक आहे.
  5. अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी प्रवेशिका खालील पत्त्यावर पोहोचल्या पाहिजेत:

श्री लवकुश यादव, अवर सचिव (संवाद)

भारतीय निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली 110001.

ईमेल: media-division@eci.in

दूरध्वनी क्रमांक: 011-23052033

खालील चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले जातील.

  1. मुद्रित माध्यम
  2. इलेक्ट्रॉनिक (टेलिव्हिजन) माध्यम
  3. इलेक्ट्रॉनिक (रेडिओ) माध्यम
  4. ऑनलाईन (आंतरजाल)/सोशल मीडिया

अशा सर्व शिफारसी/ प्रवेशिका 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत भारताच्या निवडणूक आयोगाकडे पोहोचल्या पाहिजेत.


* * *

G.Chippalkatti/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869510) Visitor Counter : 563