विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे स्वच्छता विशेष मोहिमेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
Posted On:
20 OCT 2022 2:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2022
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, आपल्या अधीनस्थ कार्यालये आणि स्वायत्त संस्था यांच्यासह संयुक्तपणे 2 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या अवधीत स्वच्छता मोहीम तसेच प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे.
या मोहिमेअंतर्गत नवी दिल्ली येथील तंत्रज्ञान भवनाच्या नवीन इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी कार्यरत असलेले एअर युनिक क्वालिटी मॉनिटरिंग - AUM एकक, प्रदूषण पातळी प्रदर्शित करणाऱ्या डॅशबोर्डशी जोडले गेले आहे. या एककाच्या माध्यमातून हवेतील प्रदूषण पातळीची अद्ययावत माहिती प्रदर्शित केली जाते.

AUM एककामधून प्राप्त होणारी माहिती आता युपीआय इंटरफेसच्या माध्यमातून दिल्ली प्रदूषण नियंत्रण आयोगाकडे अव्याहतपणे पाठवली जाते आहे.
साफसफाई करण्यासाठी विभागाने राईड-ऑन स्वीपर, ऑटो स्क्रबर ड्रायर, सिंगल डिस्क क्लीनर, वेट अँड ड्राय क्लीनर, ड्राय व्हॅक्यूम क्लिनर, हाय प्रेशर क्लीनर अशा यंत्रांचाही वापर सुरू केला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग परिसरात यांत्रिक साफसफाई
नवीन इमारती बांधण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग TIFAC ब्लॉक ही आपली एक जुनी इमारत पर्यावरणपूरक पद्धतीने पाडत आहे. धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी विभागाने फॉगिंग मशिन बसवले असून अशी आणखी फॉगिंग मशीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विभागाने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत टेक्नॉलॉजी भवन परिसरातील बांधकामाच्या "हरित" पैलूंवर जास्त भर दिला आहे तसेच कार्यालयीन जागेत वाढ करण्यास प्रोत्साहन दिले आहे.
* * *
G.Chippalkatti/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1869504)
Visitor Counter : 176