संरक्षण मंत्रालय
डेफएक्स्पो2022 च्या पार्श्वभूमीवर संरक्षण सचिवांच्या बांगलादेश आणि कझाकस्तानच्या शिष्टमंडळांबरोबर द्विपक्षीय बैठकी
Posted On:
20 OCT 2022 9:07AM by PIB Mumbai
गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुरु असलेल्या 12 व्या डेफएक्स्पो 2022 च्या पार्श्वभूमीवर संरक्षण सचीव डॉ. अजय कुमार यांनी ऑक्टोबर 19, 2022 रोजी बांगलादेश आणि कझाकस्तानच्या शिष्टमंडळांबरोबर द्विपक्षीय बैठकीत भाग घेतला.
बांगलादेशातील सशस्त्र दल विभागाचे कर्मचारी अधिकारी प्रमुख लेफ्टनंट जनरल वाकर-उझ-झमान यांच्या नेतृत्वाखालच्या बांगलादेशच्या शिष्टमंडळाची त्यांनी भेट घेतली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबाबतच्या प्रश्नांचा त्यांनी आढावा घेतला आणि संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
संरक्षण सचिवांनी त्यानंतर कझाकस्तानचे उप संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल रुस्लान श्पेकबायेव यांच्या नेतृत्वाखालच्या कझाकिस्तानच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. प्रशिक्षण, संयुक्त सराव आणि क्षमता विकासावर करण्यावर विशेष भर देत द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
***
Gopal C/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1869418)
Visitor Counter : 211