संरक्षण मंत्रालय
डिफेन्स एक्सपो 2022 च्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण सचिवांनी घेतल्या आफ्रिकी राष्ट्रांच्या प्रतिनिधीमंडळांसोबत द्विपक्षीय बैठका
Posted On:
19 OCT 2022 8:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2022
डिफेन्स एक्सपो 2022 चा एक भाग म्हणून, गुजरातमध्ये गांधीनगर इथे काल 18 ऑक्टोबर 2022 रोजी दुसऱ्या भारत आफ्रिका सुरक्षा विषयक संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. या संवादसत्रांदरम्यान, भारताच्या संरक्षण सचिवांनी आफ्रिकी राष्ट्रांच्या प्रतिनिधीदलांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या.
सुदानच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस लेफ्टनंट जनरल इस्मान मोहम्मद हसन करार यांच्याशी झालेल्या भारताच्या द्विपक्षीय बैठकीत, सुदानचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल रशद अब्दुल हामिद इस्माइल अब्दुल्ला हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत भारत आणि सुदान या दोन देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षणविषयक सहकार्याबाबतचे मुद्दे आणि भविष्यात परस्पर सहकार्यासाठी कुठली महत्त्वाची क्षेत्र उपलब्ध असू शकतात यावर चर्चा झाली.
झांबियाच्या संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव नॉर्मन चिपाकुपाकु यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने भारताचे संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार यांची भेट घेतली. प्रशिक्षण आणि सामर्थ्य वृद्धीच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली, तसेच दोन्ही देशांमधल्या संरक्षणविषयक परस्पर सहकार्याचा आढावा घेण्यात आला.
नायजेरच्या संरक्षण विभागाचे सरचिटणीस ब्रिगेडियर जनरल डिड्डील्ली अमादौ यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाचीही डॉक्टर अजय कुमार यांच्यासोबत बैठक झाली. दोन्ही देशांमधल्या संरक्षण विषयक परस्पर सहकार्याच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
मालीच्या संरक्षण विभागाचे सरचिटणीस मेजर जनरल सिद्दिकी समेक यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळानही अजय कुमार यांची भेट घेतली. संरक्षण उद्योग क्षेत्रातल्या सहकार्यासह, संरक्षणविषयक सहकार्याच्या इतर प्रमुख मुद्द्यांबाबत या बैठकीत चर्चा झाली
* * *
S.Kakade/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1869317)
Visitor Counter : 177