नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य परिषदेच्या पाचव्या सर्वसाधारण सभेचे उद्घाटन
Posted On:
18 OCT 2022 10:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2022
आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य परिषदेच्या पाचव्या सर्वसाधारण सभेचे आज केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ते या सहकार्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्षही आहेत. या सहकार्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद भारत आणि फ्रान्स ही राष्ट्रे संयुक्तपणे भूषवत आहेत. पाचव्या सर्वसाधारण सभेमध्ये, 20 देशांचे मंत्री आणि 110 सदस्य देशांचे प्रतिनिधी तसेच भविष्यात या सहकार्यामध्ये येऊ शकणाऱ्या 18 देशांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते.
जीवाश्म इंधनावर मानवाचे असलेले अवलंबित्व आपल्या आरोग्यासाठी घातक आहे, केवळ पर्यावरणच नव्हे तर आपल्या अर्थव्यवस्थेसाठीही ते हानीकारक आहे, असे दर्शवणारे कित्येक प्रसंग गेल्या काही वर्षांत आपल्यासमोर आलेत, असे प्रतिपादन यावेळी आर के सिंह यांनी केले. मात्र, या संकटावर मात करण्यासाठीची साधने, आपल्याजवळ आहेत ही त्यात समाधानाची बाब असून, येत्या काळात, तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण या स्रोतांचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता हे तंत्रज्ञान आपण किती लवकर आत्मसात करतो, त्याची अंमलबजावणी किती लवकर करतो, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. ऊर्जा रूपांतरणाच्या या आपल्या संकल्पात, हा विकास, ऊर्जेची कमतरता असलेल्या आणि ऊर्जा सुरक्षेची गरज असलेल्या देशांपर्यंत पोहोचवणे ही देखील आपलीच जबाबदारी आहे, असेही आर. के. सिंह यावेळी म्हणाले.
आयएसएच्या सदस्य देशांना, सौरऊर्जा पूरक धोरण आखण्यास आणि त्याची अंमलबजावणी करण्यास तसेच त्याविषयीची नियमावली विकसित करण्यात, आपण मदत करु शकतो, हे आपले ध्येय आहे. ज्यामुळे, आयएसएच्या सौरऊर्जेच्या अजेंडयानुसार, त्या देशांना आपले राष्ट्रीय ऊर्जाविषयक चित्र स्पष्ट करुन, सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या द्वारे त्याची अंमलबजावणी करता येईल.
आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याची रचना, अंतर्गत तांत्रिक कौशल्यासह आंतरराष्ट्रीय संसाधन केंद्र म्हणून केली गेली आहे ज्यामुळे, सदस्य राष्ट्रांना याच्या सुविधा सहज उपलब्ध होतील. तसेच मोठ्या स्तरावरील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यासही ही संस्था सक्षम आहे. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याच्या स्थापनेपासून संस्थेने मोठी प्रगती केली आहे. या संस्थेच्या प्रत्येक सदस्याने दिलेल्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे आपण खूप वेगाने पुढे जात आहोत, असे आर के सिंह यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय सौर संघटनेची सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च निर्णय घेणारी व्यवस्था आहे, ज्यामध्ये प्रत्येक सदस्य देशाचे प्रतिनिधित्व केले जाते. ही संस्था ISA च्या आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेते आणि त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करायच्या समन्वित कृती निश्चित केल्या जातात. आयएसएच्या सर्वसाधारण सभेची वार्षिक मंत्रिस्तरीय बैठक होत असते.
आयएसएच्या पाचव्या सर्वसाधारण सभेत 110 सदस्य देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चा आणि चर्चांमुळे सौर उर्जेच्या उपयोजनाला चालना देण्यासाठी समितीमध्ये अधिक एकमत होण्याची अपेक्षा आहे. आयएसएच्या पाचव्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने, आशियाई विकास बँक आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने, उद्या म्हणजेच,19 ऑक्टोबर 2022 मध्ये नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य, रोजी स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी नवीन तंत्रज्ञानावर उच्च-स्तरीय परिषद आयोजित केली जाणार आहे.
ह्या परिषदेत पूर्ण तसेच संकल्पनांवर आधारित तांत्रिक सत्रे असतील. सौरऊर्जा तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि बाजारपेठेतील प्रमुख मुद्दे पूर्णत्वास मांडतील, तर संकल्पनांवर चर्चा करुन त्या समजून घेतल्या जातील. शैक्षणिक संस्था, थिंक टँक, उद्योग, आर्थिक क्षेत्र आणि धोरणकर्ते अशा विविध पार्श्वभूमीतील वक्ते यातील चर्चासत्रात सहभागी होतील आणि आपल्या कल्पना यावेळी सांगतील.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1869009)
Visitor Counter : 210