रेल्वे मंत्रालय

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर भारतातील पहिल्या ॲल्युमिनियम मालवाहू डब्यांचे - 61 BOBRNALHSM1 चे उद्‌घाटन

Posted On: 16 OCT 2022 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16  ऑक्टोबर  2022

केंद्रीय रेल्वे मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी आज भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर भारतातील पहिल्या पूर्णपणे ॲल्युमिनियम पासून बनलेल्या पहिल्या मालवाहू डब्याचे- 61 BOBRNALHSM1 चे उद्घाटन केले. हे रेक्स बिलासपूर इथे पोहचवले जाणार आहेत.

मेक इन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत हा एक समर्पित प्रयत्न आहे  जो आरडीएसओ ( RDSO), हिंदाल्को (HINDALCO) आणि बेसको वॅगन(Besco Wagon) यांच्या सहकार्याने संपूर्णपणे स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि विकसित केला गेला आहे.

ॲल्युमिनियम डब्याची वैशिष्ट्ये:

  • हे डब्बे वेल्डिंगशिवाय पूर्णपणे लॉकबोल्ट केलेले सुपरस्ट्रक्चर आहे
  • सामान्य टायर स्टीलच्या रेकपेक्षा वजनाने 3.25 टन कमी आहे, तर 180 टन अतिरिक्त वाहून नेण्याची क्षमता असल्याने परिणामी प्रति वॅगन एकूण क्षमतेत वाढ झाली आहे.
  • उच्च पेलोड ते टेअर प्रमाण 2.85

  • कमी झालेल्या वजनामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल ज्यामुळे रिकाम्या दिशेने जाताना इंधनाचा कमी वापर होईल आणि लोड केलेल्या स्थितीत मालवाहतुकीची अधिक वाहतूक शक्य होईल. एक दबा त्याच्या संपूर्ण  वापरात 14,500 टन पेक्षा जास्त CO2 वाचवू शकतो.
  • रेकचे पुनर्विक्री मूल्य 80% आहे.
  • संरचना पूर्णणे ॲल्युमिनियमची असल्याने खर्च 35% जास्त आहे.
  • उच्च गंज आणि घर्षण प्रतिकारामुळे देखभाल खर्च कमी येतो.

लोह उद्योगात मोठ्या प्रमाणात निकेल आणि कॅडमियमचा वापर होतो जे आयात केले जाते.  त्यामुळे, ॲल्युमिनियम वॅगनच्या प्रसारामुळे आयात कमी होईल. त्याचवेळी, स्थानिक ॲल्युमिनियम उद्योगासाठी हे फायद्याचे ठरणार आहे.

 

 

 

 

R.Aghor/V.Yadav/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1868315) Visitor Counter : 222