रेल्वे मंत्रालय
रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला मोठी चालना
भारतीय रेल्वेने एकूण ब्रॉडगेज मार्गांच्या 81.51% मार्गाचे विद्युतीकरण केले पूर्ण
एप्रिल ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 851 मार्ग किलोमीटर (RKMs)विद्युतीकरण
Posted On:
14 OCT 2022 4:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2022
भारतीय रेल्वेने आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण करण्याच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा आरंभ केला असून त्यामुळे अधिक चांगल्या इंधन ऊर्जेचा वापर होण्याबरोबरच अतिशय मौल्यवान अशा परकीय चलनात बचत देखील होणार आहे.
भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत , सप्टेंबर 2022 पर्यंत, 851 मार्ग किलोमीटर (RKMs) विद्युतीकरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. जे आर्थिक वर्ष 2021-22 च्या त्याच कालावधीतील 562 मार्ग किलोमीटर (RKM) च्या तुलनेत 51.4 टक्क्यांनी अधिक आहे. विद्यमान आर्थिक वर्षात रेल्वेने 6500 मार्ग किलोमीटर (RKMs) विद्युतीकरणाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.
2021-22 या वर्षात भारतीय रेल्वेने 6,366 मार्ग किलोमीटर (RKMs) विद्युतीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण केले आहे, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. त्यापूर्वीचे सर्वोच्च विद्युतीकरण 2020-21 वर्षात 6,015 मार्ग किलोमीटर इतके होते.
दिनांक 30.09.2022 पर्यंत,भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गांच्या नेटवर्कच्या 65,141 मार्ग किलोमीटर (RKM) पैकी (कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि KRCL सह), 53,098 किलोमीटर ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, जे एकूण ब्रॉडगेज मार्ग नेटवर्कच्या 81.51% आहे.
100% विद्युतीकरण मोहिमेच्या दिशेने वाटचाल : 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक बनण्याचा रेल्वेचा प्रयत्न.
S.Kulkarni/B.Sontakke/P.Malandkar
(Release ID: 1867767)
Visitor Counter : 533