राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती आसाम दौऱ्यावर; भारतीय तंत्रज्ञान संस्था ( IIT) गुवाहाटी येथे उच्च शक्तीच्या मायक्रोवेव्हच्या सुट्या भागांच्या डिझाइन आणि विकासासाठी सुपर कॉम्प्युटर सुविधा आणि प्रयोगशाळेचे केले उद्घाटन , तसेच धुबरी येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे केले उद्घाटन; एनआयव्हीच्या दोन विभागीय संस्थांचीही केली पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
13 OCT 2022 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2022
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (13 ऑक्टोबर 2022) भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) गुवाहाटी येथे उच्च शक्तीच्या मायक्रोवेव्हच्या सुट्या भागांच्या डिझाइन आणि विकासासाठी सुपर कॉम्प्युटर सुविधा 'परम-कामरूपा' आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. राष्ट्रपतींनी धुबरी येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचेही उद्घाटन केले तसेच या प्रसंगी (i) दिब्रुगढ, आसाम आणि (ii) जबलपूर, मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय विषाणू संस्था -एनआयव्हीच्या दोन विभागीय संस्थांची पायाभरणी केली.
अगदी कमी कालावधीत आयआयटी गुवाहाटीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीने प्रदेश आणि देशाचा गौरव वाढवला आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
भारत तांत्रिक नवसंशोधनांमध्ये अग्रेसर ठरावा आणि समाजाचे मोठ्या प्रमाणावर कल्याण व्हावे यासाठी देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांनी अधिकाधिक संशोधन करून विकासाला चालना द्यावी असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.
आज भारताचा ईशान्य प्रदेश विकासाच्या दिशेने मोठी पावले टाकत आहे तसेच प्रदेश आणि देशातील लोकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा आणि शिक्षण यंत्रणा प्रदान करण्यासाठी असाधारण प्रयत्न करत आहे, असे त्या म्हणाल्या.
केंद्र आणि राज्य सरकारचे विविध प्रकल्प आणि त्यामुळे या क्षेत्राची झालेली प्रगती भारताला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत राष्ट्र आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीचा पाया रचतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1867552)
आगंतुक पटल : 219