युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हिमाचल प्रदेशात वॉटर स्पोर्ट्स केंद्राचे उद्घाटन
Posted On:
09 OCT 2022 6:17PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते आज सकाळी हिमाचल प्रदेशात बिलासपूर इथे, कोलडॅम बारमना इथे वॉटर स्पोर्ट्स केंद्राचे उद्घाटन झाले. हिमाचल प्रदेशातील अशा प्रकारचे हे पहिलेच वॉटर स्पोर्ट्स केंद्र आहे.भारतीय क्रीडा प्राधिकरण-साई आणि राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ- एनटीपीसी ने संयुक्तरित्या या केंद्राची उभारणी केली आहे.
यावेळी, साई आणि एनटीपीसी यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला.
अगदी अल्पावधीत ह्या केंद्राची उभारणी कशी झाली, याबद्दल माहिती देतांना अनुराग ठाकूर म्हणाले, “ केवळ एका महिन्याच्या कालावधीत वॉटर स्पोर्ट्सची व्यवस्था करण्यात आली, आणि यासाठी मी साई आणि एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो, कारण त्यांच्या परिश्रमामुळेच हे केंद्र तयार होऊ शकले. या केंद्रात, रोईंग , कायकिंग, कनोइंग अशा वॉटर स्पोर्ट्ससाठी 40 खेळाडूंची निवड केली जाईल. या केंद्रात अत्याधुनिक उपकरणे आहेत, तसेच मुलामुलींसाठी वसतिगृह आहेत, त्याशिवाय प्रशिक्षण सुविधाही आहे. तसेच, ह्या केंद्रात राष्ट्रीय स्पर्धा देखील भरवल्या जातील, अशी आम्हाला आशा आहे.”
रोईंग, कायकिंग, कनोइंग यासारख्या वॉटर स्पोर्ट्ससाठी समर्पित प्रशिक्षण केंद्र म्हणून हे कार्यरत असेल.
गुजरात इथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिमाचल प्रदेशातील महिला कबड्डी चमूचा सत्कारही यावेळी या कार्यक्रमात अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866266)
Visitor Counter : 184