कोळसा मंत्रालय
एकूण कोळसा उत्पादनात सप्टेंबरमध्ये 12% ने वाढ होऊन ते 57.93 दशलक्ष टन
Posted On:
03 OCT 2022 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2022
भारतातील एकूण कोळसा उत्पादनात सप्टेंबर 2021 च्या तुलनेत, सप्टेंबर 2022 मध्ये 12.01 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण उत्पादन गतवर्षाच्या 51.72 दशलक्ष मेट्रीक टनवरून 57.93 दशलक्ष मेट्रिक टन इतके वाढले आहे.
महत्वाच्या 37 खाणींपैकी 25 खाणींची उत्पादन पातळी 100 टक्क्यांहून अधिक असून पाच खाणींचे उत्पादन सप्टेंबर महिन्यात 80 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान होते.
कोळशावर आधारित वीज निर्मितीमध्ये सप्टेंबर 2021 च्या तुलनेत सप्टेंबर 2022मध्ये 13.40% वाढ झाली आहे. सप्टेंबर 202च्या तुलनेत सप्टेंबर 2022 विजेच्या एकूण निर्मितीत 13.77%अधिक वाढ झाली.
* * *
S.Kakade/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1864844)
Visitor Counter : 304