कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारांची संकल्पना आणि स्वरूप आमूलाग्र बदलले आहे: केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी दिल्या जाणाऱ्या पंतप्रधान पुरस्कार 2022 साठीची योजना आणि वेब पोर्टलचा डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आरंभ
Posted On:
03 OCT 2022 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश, डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2022 या वेब पोर्टलचा (http://www.pmawards.gov.in) अधिकृत शुभारंभ झाला.
पंतप्रधान पुरस्कार वेब पोर्टलवरील पात्र नोंदणीला 3 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होईल आणि 3 ऑक्टोबर 2022 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत या पोर्टलवर अर्ज दाखल करता येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारांची संकल्पना आणि स्वरूप आमूलाग्र बदलले आहे, असे डॉ जितेंद्र सिंग यावेळी म्हणाले. या योजनेचा उद्देश रचनात्मक स्पर्धेला चालना देणे, नवोन्मेष आणि प्रतिकृतीला प्रोत्साहन देण्यासह उत्कृष्ट कार्यपद्धतीचे संस्थात्मकीकरण करणे हे होय.
पंतप्रधान पुरस्कार 2022 मध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल: (i) ट्रॉफी, (ii) स्क्रोल आणि (iii) पुरस्कारप्राप्त जिल्हा/संस्थेला 20 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल जिचा विनियोग, सार्वजनिक हितासाठीच्या प्रकल्प/कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी किंवा कोणत्याही क्षेत्रातील संसाधनांमधील त्रुटी आणि तफावत दूर करण्यासाठी करता येईल.
यासाठीच विचाराधीन कालावधी 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2022 असा आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी दिल्या जाणाऱ्या पंतप्रधान पुरस्कार 2022 अंतर्गत एकूण पुरस्कारांची संख्या 16 असेल.
यामागे केवळ संख्यात्मक लक्ष्यांची पूर्तता करणे हा दृष्टिकोन नसून सुशासनाला प्राधान्य, दर्जात्मक उद्दिष्टपूर्ती आणि शेवटच्या घटकापर्यंत संपर्क या घटकांवर भर दिला आहे. या प्राधान्यक्रमानुसार पुरस्कारांसाठीच्या अर्जांचे सुशासन, गुणात्मक आणि परिमाणात्मक या तीन घटकांनुसार मूल्यांकन केले जाईल, असे सिंग यांनी सांगितले.
वर्ष 2022 साठी, सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीच्या पंतप्रधान पुरस्कारांची योजना खालील क्षेत्रातील सरकारी अधिकाऱ्यांच्या योगदानाचे मूल्यांकन करणे हे आहे : a. हर घर जल योजनेद्वारे शुद्ध पाणी (स्वच्छ जल) योजनेचा प्रचार करणे, b. आरोग्य आणि कल्याण केंद्रांद्वारे स्वस्थ भारत (निरोगी भारत) चा प्रचार करणे. c. समग्र शिक्षण योजनेअंतर्गत वर्गातील समतोल आणि सर्वसमावेशक वातावरणासह दर्जेदार शिक्षणाचा प्रसार करणे. d. समग्र दृष्टीकोन आणि नवकल्पनांवर विशेष लक्ष केंद्रित करून आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाद्वारे सर्वांगीण विकास साध्य करणे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा: http://www.pmawards.gov.in
* * *
S.Thakur/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1864763)
Visitor Counter : 187