पंतप्रधान कार्यालय
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी खादी आणि हस्तनिर्मित उत्पादने खरेदी करण्याचे लोकांना केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2022 9:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी लोकांनी खादी आणि हस्तनिर्मित उत्पादने खरेदी करण्याचे आवाहनही मोदींनी केले आहे. त्यांनी महात्मा गांधींबद्दलच्या भावना व्यक्त करणारी ध्वनिचित्रफीतही सामायिक केली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"#गांधीजयंतीनिमित्त महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करत आहे. ही गांधी जयंती आणखी एका कारणाने विशेष आहे कारण भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा करत आहे. बापूंच्या आदर्शांना सदैव पालन करुया. गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी खादी आणि हस्तनिर्मित उत्पादने खरेदी करण्याची मी तुम्हा सर्वांना विनंती करतो."
***
S.Pophale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1864427)
आगंतुक पटल : 296
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam