जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जल शक्ती मंत्रालयातील पेयजल आणि स्वच्छता विभाग, 2 ऑक्टोबर 2022 रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करणार


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणार

Posted On: 30 SEP 2022 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2022 

 

जलशक्ती मंत्रालयांतर्गत येणारा पेयजल आणि स्वच्छता विभाग  2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती स्वच्छ भारत दिवस  म्हणून साजरी करणार आहे.

विभागातर्फे 2 ऑक्टोबर 2022 रोजी विज्ञान भवन येथे दिवसभराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू,प्रमुख पाहुण्या म्हणून सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील.  केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय जलशक्ती मंत्री  गजेंद्रसिंह शेखावत, जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल, आणि जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

या कार्यक्रमात,केंद्रीय जलशक्ती मंत्री राष्ट्रपतींसमोर   स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2022 अहवाल सादर करतील.  2018 पासून विभाग स्वच्छ सर्वेक्षण आयोजित करत आहे. स्वच्छ सर्वेक्षण अहवालात क्रमवारी, क्षेत्रीय  सर्वेक्षण, मूल्यांकन आणि नागरिकांच्या धारणा यांचा तपशील दिला जाईल. या व्यतिरिक्त, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 शी संबंधित तपशील देखील सामायिक केले जातील.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण  2022 आणि जल जीवन अभियान यांच्या कार्यक्षमता मूल्यांकन अहवालाच्या निष्कर्षांवर आधारित, विभागाच्या दोन मोहिमांची अंमलबजावणी आणि प्रगतीच्या आधारे ,   सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांचा सत्कार, 2 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमातकेला जाईल.

या कार्यक्रमात जल जीवन सर्वेक्षण 2023 चा प्रारंभदेखील केला जाईल.  सर्वेक्षणातून  सर्व ‘हर घर जल’ गावांमध्ये नळ जोडणीच्या कार्यात्मकतेबाबत सांगितले जाईल.

या प्रसंगी विभाग दोन मोहिमा देखील सुरू करेल:

  • विष्ठा गाळ सुधारित व्यवस्थापनाच्या दिशेने घरांमध्ये  दोन खड्ड्यांच्या शौचालयाला प्रोत्साहन देण्यासाठी "टू ट्वीन पिट पुनरुत्थान अभियान". या मोहिमेची सांगता जागतिक शौचालय दिनी म्हणजेच19 नोव्हेंबर 2022 रोजी होईल.
  • ‘स्वच्छ जल से सुरक्षा’: पाण्याच्या गुणवत्तेवर आधारित स्वच्छ पाण्याद्वारे सुरक्षा  या  मोहिमेमुळे स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यात मदत होईल आणि ग्रामीण घरांमध्ये पुरवल्या जाणार्‍या पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

 

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1863955) Visitor Counter : 251