आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
75 दिवसांच्या ‘कोविड लसीकरण अमृत महोत्सवा’चा झाला समारोप
Posted On:
30 SEP 2022 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2022
75 दिवसांच्या ‘कोविड लसीकरण अमृत महोत्सवा’चा आज समारोप झाला. हा उपक्रम 15 जुलै 2022 रोजी अभियान स्तरावर सुरू करण्यात आला होता. यात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी, पात्र प्रौढ लोकसंख्येमध्ये ( 2री मात्रा घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाले आहेत अशा 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती) कोविड लसीची प्रीकौशन मात्रा घेण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी विशेष कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते.
75 दिवसांत, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, बस स्थानकांवर 11,104 शिबिरे, रेल्वे स्थानकांवर 5,664 शिबिरे, विमानतळांवर 511 शिबिरे, विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 1,50,004 शिबिरे, धार्मिक यात्रांच्या मार्गांवर 4,451 शिबिरे आयोजित करण्यात आली. विविध खाजगी आणि सरकारी कामाच्या ठिकाणी आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये 11,30,044 हून अधिक शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
परिणामी, या 75 दिवसांच्या कालावधीत 76.18 लाखांहून अधिक पहिली मात्रा, 2.35 कोटी दुसरी मात्रा आणि 15.92 कोटी प्रीकौशन मात्रा देण्यात आल्या. प्रतिदिन 20.68 लाख प्रीकौशन मात्रांसह 24.73 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
15 जुलै 2022 रोजी कोविड लसीकरण अमृत महोत्सवाच्या प्रारंभी, 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी केवळ 8% लोकांना प्रीकौशन मात्रा मिळाली होती. 75 दिवसांची मोफत लसीकरण मोहीम सुरू केल्यामुळे पात्र लोकसंख्येपैकी 27% लोकांना आता प्रीकौशन मात्रा मिळाली आहे.
* * *
S.Kane/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863883)
Visitor Counter : 178