कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
नागरिकांच्या आणि संबंधित क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या एकात्मतेला चालना देण्याकरिता "विज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाची" गरज केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केली व्यक्त
Posted On:
29 SEP 2022 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या एकात्मतेला समाजात चालना देण्यासाठी "विज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाची" गरज आहे. त्या माध्यमातून नागरिक आणि संबंधित क्षेत्राच्या गरजा पूर्ण करणे विज्ञानास शक्य होईल असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.
"विज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाची बांधणी कार्यक्रमाचा" प्रारंभ केल्यानंतर डॉ जितेंद्र सिंह बोलत होते. सरकारी सेवा वितरणासाठी, शास्त्रज्ञांनी त्यांच्या कामात आघाडीवर असणे आणि लोकांच्या भल्यासाठी विज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता वाढवणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.
भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सामाजिक हित साधण्यावर अधिक भर दिला जातो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे किनारपट्टी भागात चक्रीवादळाच्या अंदाजासाठी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर होय. त्याचप्रमाणे इंडिया स्टॅकवर बनवलेले युनायटेड पेमेंट इंटरफेस सारखे तंत्रज्ञान प्रत्येकासाठी आर्थिक देवाणघेवाणीत क्रांती आणत आहे असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले.
‘भारतात विज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाची उभारणी" हा शास्त्रज्ञांसाठी अनोख्या पद्धतीने तयार केलेला सहयोगात्मक कार्यकारी विकास कार्यक्रम आहे. प्रयोगशाळा चालवणारे किंवा नेतृत्वाची भूमिका आणि संशोधन संस्थांचे भावी संचालक होण्याची शक्यता असणाऱ्यांसाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम शास्त्रज्ञांमधील संवाद, डिझाइन थिंकिंग आणि प्रकल्प व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा विकास करेल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या पहिल्या तुकडीत भारत सरकारच्या डीएसटी, डीबीटी, इस्त्रो, डीएई, सीएसआयआर, एमओईसएस आणि एमओईएफसीसी या 7 वैज्ञानिक विभागांचा सहभाग आहे.
S.Kane /V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863403)
Visitor Counter : 279