पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जापानच्या पंतप्रधानांसोबत भेट
Posted On:
27 SEP 2022 10:13AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान माननीय फुमियो किशिदा यांची आज त्यांच्या जपान दौऱ्यादरम्यान भेट घेतली. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. भारत आणि जापान यांच्यातील भागीदारी बळकट करण्यासाठी तसेच मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेत दिवंगत पंतप्रधान आबे यांच्या योगदानाचा पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये वैचारिक देवाणघेवाण झाली. त्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. भारत – जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी तसेच परस्परांच्या देशांबरोबरच विविध आंतरराष्ट्रीय गट आणि संस्थांमध्ये एकत्र काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरूच्चार केला.
***
Gopal C/Madhuri/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862454)
Visitor Counter : 306
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam