गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय ‘स्वच्छ टॉयकॅथोन’ ह्या कचऱ्यापासून खेळणी बनवण्याच्या अभिनव स्पर्धेचे आयोजन करणार
Posted On:
25 SEP 2022 4:27PM by PIB Mumbai
भारतीय खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने, राष्ट्रीय खेळणी कृती आराखडा 2020-एनएपीटी जाहीर केला आहे. यात पारंपरिक हस्तकौशल्ये आणि हातांनी तयार केलेल्या खेळण्यांना प्रोत्साहन देण्याचाही विचार असून त्याद्वारे भारताला खेळणी उद्योगांचे जागतिक केंद्र बनवण्याचा उद्देश आहे. उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने,केंद्र सरकारच्या 14 मंत्रालयांसह ह्या एनएपीटी च्या अंमलबजावणीचे काम सुरु केले आहे.
भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, तसेच देशांत युवा लोकसंख्येचं प्रमाण अधिक, म्हणजे देशातली अर्धी लोकसंख्या 25 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. अर्थव्यवस्थेत होत असलेल्या प्रगतीमुळे लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, आजकाल मुलांसाठी अभिनव खेळणी तयार केली जात आहे. ह्या सगळ्या कारणांमुळे देशांत खेळण्यांची मागणी देखील वाढते आहे.
सतत बदलत जाणाऱ्या वस्तू वापराच्या पद्धती आणि ई- कॉमर्स मध्ये वेगाने होणारी वाढ, यामुळे देशांत गेल्या एक दशकापासून दरडोई कचऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे शहरांमधील स्थानिक महापालिकांसाठी घनकचरा व्यवस्थापन हे मोठे आव्हान झाले आहे. स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा (SBM 2.0) एक ऑक्टोबर 2021 पासून पंतप्रधानांच्या हस्ते सुरु झाला असून, ह्या अभियानाचे उद्दिष्ट 2026 पर्यंत देशातली शहरे कचरामुक्त करणे हे आहे.
एकीकडे देशांत खेळण्यांची मागणी वाढते आहे, तसेच दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापन आणि त्याचा इतर गोष्टींवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, ह्या दोन्ही समस्यांवर एकच समाधान शोधण्यासाठी ‘स्वच्छ टॉयकॅथोन’ ही अभिनव कल्पना राबवली जाणार आहे. ह्या स्पर्धेअंतर्गत, कचऱ्यापासून खेळणी बनवण्यासाठी संशोधन करत नवे मार्ग शोधले जाणार आहेत. ही स्पर्धा, सर्व लोक आणि गटांसाठीही खुली असून सुक्या कचऱ्यापासून खेळणी बनवण्याच्या कल्पना यात मांडायच्या आहेत. या स्पर्धेत, अशा संरचनांची निवड करण्याला प्राधान्य असेल, ज्यातून मोठ्या प्रमाणावर खेळणी तयार करण्यासाठी त्याच्या व्यापक आवृत्ती तयार केल्या जातील, तसेच त्यात सुरक्षिततेचे सगळे निकष पूर्ण केले जातील. तसेच खेळण्याच्या सौंदर्याकडे लक्ष दिले जाईल. ह्या उपक्रमात, आयआयटी गांधीनगर इथले सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग नॉलेज पार्टनर असेल.
“स्वच्छ अमृत महोत्सवाअंतर्गत” ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.17 सप्टेंबर-सेवा दिवस ते 2 ऑक्टोबर 2022 स्वच्छता दिवस या पंधरवड्यात हा महोत्सव साजरा केला जात आहे.
“माय गव्ह इनोव्हेट इंडिया” पोर्टल वरुन ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार विभागाचे सचिव, उदया म्हणजेच 26 सप्टेंबर 2022 रोजी आभासी पद्धतीने ह्या स्पर्धेचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम या bit.ly/3r1OaIE लिंकवर बघता येईल.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1862095)
Visitor Counter : 224