आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 217.56 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वर्षे वयोगटातील 4.09 कोटींहून जास्त किशोरवयींना मिळाली लसीची पहिली मात्रा

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 43,994

गेल्या 24 तासांत आढळले 4,777 नवे रुग्ण

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.72%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.63%

Posted On: 25 SEP 2022 11:36AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 217.56 कोटी ( 2,17,56,67,942) मात्रांचा टप्पा पार केला.

देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरवयींना कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम 16 मार्च 2000 22 रोजी सुरू झाली. आतापर्यंत 4.09 कोटीहून जास्त (4,09,40,886) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10414991

2nd Dose

10116876

Precaution Dose

6979559

FLWs

1st Dose

18436448

2nd Dose

17713627

Precaution Dose

13573416

Age Group 12-14 years

1st Dose

40940886

2nd Dose

31531491

Age Group 15-18 years

1st Dose

61915598

2nd Dose

52962331

Age Group 18-44 years

1st Dose

561179893

2nd Dose

515390777

Precaution Dose

90004699

Age Group 45-59 years

1st Dose

204012489

2nd Dose

196872442

Precaution Dose

46572396

Over 60 years

1st Dose

127655498

2nd Dose

123079807

Precaution Dose

46314718

Precaution Dose

20,34,44,788

Total

2,17,56,67,942

 

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 43,994 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.10% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.72% झाला आहे. गेल्या 24 तासात 5,196 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,39,95,610 झाली आहे.

गेल्या 24 तासात 4,777 नवे रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासात एकूण 3,02,283 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.36 कोटींहून अधिक (89,36,54,428) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.63% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.58% आहे.

***

S.Pophale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1862044) Visitor Counter : 134