आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची 4 वर्षे आणि आयुष्मान भारत डिजिटल अभियानाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित आरोग्य मंथन 2022 चे डॉ.मनसुख मांडविया यांच्या हस्ते होणार उद्घाटन
डॉ मनसुख मांडविया प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी साधणार संवाद
Posted On:
23 SEP 2022 4:58PM by PIB Mumbai
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (एबी पीएम -जेएवाय) अंमलबजावणीची चार वर्षे आणि आयुष्मान भारत डिजिटल अभियानाच्या अंमलबजावणीचे एक वर्ष साजरे करण्यासाठी आयोजित “आरोग्य मंथन 2022” चे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया 25 सप्टेंबर 2022 रोजी उद्घाटन करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल, या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ सरकारी अधिकारीही यावेळी उपस्थित राहतील. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य सेवा क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय तज्ज्ञ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी, अभ्यासक, उद्योग आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील.
केंद्रीय आरोग्य मंत्री देशभरातील एबी पीएम -जेएवायच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून 'आरोग्य मंथन ' ची सुरुवात करतील.
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीला 23 सप्टेंबर 2022 रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत तर आयुष्मान भारत डिजिटल अभियानाला (एबीडीएम ) 27 सप्टेंबर 2022 रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. एबी पीएम -जेएवाय ही योजना राबविणाऱ्या सर्व राज्यांमध्ये, योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त 15 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत 'आयुष्मान पखवाडा(पंधरवडा )' साजरा केला जात आहे. 'आयुष्मान पंधरवडा ' अंतर्गत एबी पीएम -जेएवाय मध्ये सहभागी 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे आणि योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आयुष्मान कार्ड जारी करण्यासाठी जन मोहिमेचे आयोजन करत आहेत..
नवोन्मेषी डिजिटल आरोग्य उपाय दर्शवणाऱ्या, 'डिजी हेल्थ एक्स्पो' या प्रदर्शनात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील नवोन्मेषक सहभागी होतील.
दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात एकूण बारा सत्रे असतील.
सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये, प्रधानमंत्री आरोग्य मित्र, आणि एबी पीएम -जेएवायअंतर्गत सार्वजनिक रुग्णालये तसेच एबीडीएमअंतर्गत डिजिटल आरोग्य उपाय आणि सर्वोत्तम राज्य/केंद्रशासित प्रदेश,जिल्हा, खासगी आणि सरकारी आरोग्य सुविधा यांना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण 'आयुष्मान उत्कृष्टता पुरस्कार 2022 ने सन्मानित करेल. एबीडीएम हॅकाथॉन मालिका फेरी 1 च्या विजेत्यांनादेखील या कार्यक्रमात सन्मानित केले जाईल.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1861755)