रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने रसायन आणि खतांच्या जागतिक बाजारपेठेचे नेतृत्व करणारे असे स्वतःचे मॉडेल बनवण्याचे केंद्रीय रसायन आणि खतमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे आवाहन


रसायन आणि खत क्षेत्र, भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड दृष्टीकोनास अनुरूप जागतिक उत्पादन केंद्र बनवून परिवर्तन घडवू शकतेः डॉ. मनसुख मांडविया

Posted On: 20 SEP 2022 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या दृष्टीकोनास पूरक असे जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याची क्षमता, रसायन आणि खत क्षेत्रात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय खते आणि रसायन तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया  यांनी केले. रसायन आणि पेट्रोकेमिकल्स सल्लागार मंचाच्या तिसऱ्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खते आणि रसायन खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा हेही उपस्थित होते.

बैठकीस संबोधित करताना, डॉ. मनसुख मांडविया  म्हणाले की, भारतीय रसायन आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगाकडे राष्ट्राच्या विकासाला चालना देण्यात लक्षणीय भूमिका बजावण्याची महत्वपूर्ण क्षमता आहे.त्यामुळे, खते आणि रसायनांच्या जागतिक बाजारपेठेचे नेतृत्व करणारे स्वतःचे असे मॉडेल भारताने तयार करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. जागतिक मागणी आणि संलग्न उद्योगांच्या उदयोन्मुख गरजा यांच्या अनुरूप असे भविष्योन्मुख धोरण ठरवावे, असे आवाहन त्यांनी कंपन्या आणि सल्लागार मंचाला केले. भारताकडे आव्हानावर मात करण्याची क्षमता आहे; मात्र, त्यासाठी इच्छित परिणामांवर लक्ष केंद्रित करणारे धोरण तयार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

भारताला देशांतर्गत आणि जागतिक गरजाही भागवण्यास सक्षम अशा उंचीवर नेण्यासाठी कृती करण्यायोग्य मुद्दे निश्चित करून आम्ही आमचे स्वतःचे निर्णयक्षम असे मॉडेल तयार केले पाहिजेजे सल्लागार पद्धतीचे आणि बहुआयामीही असेल, यावर डॉ. मांडविया  यांनी ठळक प्रकाश टाकला. त्यांनी उद्योग आणि तज्ञांना देशांतर्गत गरजांचा विचार करणारे अशा संशोधन आणि विकास प्रकल्पात भागीदारी करण्यासाठी पुढे येण्याचेही आवाहन केले. मध्यम, लघु आणि सूक्ष्म क्षेत्रासारख्या  (एमएसएमई) विशिष्ट क्षेत्रांमधील आव्हाने आणि गरजा भागवल्या जातील, यासाठी संशोधन आणि विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करायला हवे, असे डॉ. मांडविया  म्हणाले.

या  बैठकीला संबोधित करताना भगवंत खुबा यांनी सरकारच्या उद्योगांना अनुकूल अशी धोरणे  आणि देशात व्यवसाय करण्यास अनुकूल अशा हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश  टाकला. भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे नमूद करून खुबा यांनी सांगितले की, राष्ट्राच्या विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावण्याची विशाल क्षमता भारतीय रसायन आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगांमध्ये आहे.

 

 

R.Aghor /U.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1860890) Visitor Counter : 46