अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सकल प्रत्यक्ष कर संकलनात 30% वाढ


आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 23% वाढ

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 17 सप्टेंबर 2022 पर्यंत अग्रिम कर संकलन रु. 2,95,308 झाल्याने दर्शवली 17% वृद्धी

चालू आर्थिक वर्षात रु. 1,35,556 कोटींचा एकूण परतावा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 83% वाढ

Posted On: 18 SEP 2022 5:07PM by PIB Mumbai

 

प्रत्यक्ष कर संकलनात वेगाने वाढ होत असून ही बाब महामारीनंतर अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन झाल्याचे संकेत देत आहे, त्याचबरोबर सरकारच्या धोरणातील स्थैर्य, प्रक्रिया सुलभ आणि अडथळाविरहित करण्यावर दिलेला भर आणि प्रभावी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर गळती रोखण्यामुळे त्याचेही परिणाम दिसत आहेत.

17 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीतून असे दिसून येत आहे की आर्थिक वर्ष 2021-22 मधील रु. 5,68,147 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रु. 7,00,669 कोटी करसंकलन झाले आहे. यामुळे करसंकलनात 23% वाढ झाली आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन रु. 7,00,669 कोटी( नेट ऑफ रिफंड) करसंकलनात रु. 3,68,484 कोटी कॉर्पोरेशन कराचा(CIT) आणि रु. 3,30,490 कोटींच्या सिक्युरिटिज व्यवहार करासह वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रत्यक्ष  करांचे( परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) सकल संकलन आर्थिक वर्ष 2021-22 मधील रु. 6,42,287 कोटींच्या तुलनेत रु. 8,36,225 कोटी झाले आहे. 2021-22च्या करसंकलनाच्या तुलनेत करसंकलनात 30% वाढ झाली आहे.

रु.8,36,225 कोटीच्या सकल  संकलनात रु. 4,36,020 कोटींच्या कॉर्पोरेशन कराचा(CIT) आणि रु. 3,98,440 कोटी सिक्युरिटीज व्यवहार करासह(STT) वैयक्तिक प्राप्तिकराचा(PIT) समावेश आहे.

किरकोळ शीर्षक निहाय संकलनामध्ये रु. 2,95,308  कोटी अग्रिम कर संकलनउद्गम कर रु. 4,34,740 कोटी , रु.77,164 कोटी  स्व-मूल्यांकन करनियमित मूल्यांकन कर रु. 20,080 कोटी  आणि 8933 कोटी रुपये इतर किरकोळ शीर्षकाखालील  कर समाविष्ट आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत 17 सप्टेंबर 2022 पर्यंत  अग्रिम  कर संकलन रु. 2,95,308 कोटी रुपये झाले असून मागील वर्षाच्या याच कालावधीतील रु. 2,52,077 कोटी रुपये आगाऊ कर संकलनाच्या तुलनेत  17% पेक्षा जास्त आहे. यामध्ये रु. 2,29,132 कोटी कॉर्पोरेशन कर (CIT) आणि रु.66176 कोटी वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) समाविष्ट आहे.

चालू आर्थिक वर्षात दाखल झालेल्या प्राप्तिकर विवरणपत्रांच्या निपटारा  प्रक्रियेच्या गतीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. 17-9-2022 पर्यंत जवळपास 93% विवरणपत्रांची पडताळणी करून निपटारा झाला आहे. यामुळे परतावे देण्याच्या वेगात मोठी वाढ झाली आहे आणि चालू आर्थिक वर्षात देण्यात आलेल्या परताव्यांच्या संख्येत सुमारे 468% वाढीची नोंद झाली आहे. आर्थिक वर्ष  2022-23 मध्ये 17 सप्टेंबर 2022 पर्यंत रु. 1,35,556 कोटींचे परतावे देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच काळापर्यंत देण्यात आलेल्या रु. 74,120 कोटींच्या तुलनेत 83% वाढीची नोंद झाली आहे.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1860390) Visitor Counter : 304