पंतप्रधान कार्यालय

ओडिशात झारसुगुडा इथल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 17 SEP 2022 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशात झारसुगुडा इथं झालेल्या रस्ते अपघातातल्या मृतांप्रती  तीव्र दुःख व्यक्त केलं  आहे.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले की ओडिशात झारसुगुडा इथं झालेला अपघात दुःखद आहे.  या अपघातात निधन पावलेल्यांच्या  कुटुंबीयांच्या दुःखात  आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  या अपघातात जखमी  झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ दे अशी प्रार्थना  आपण करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

* * *

N.Chitale/S.Naik/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860139) Visitor Counter : 123