पंतप्रधान कार्यालय
एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांचे समरकंद येथे आगमन
Posted On:
16 SEP 2022 8:57AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 16 सप्टेंबर 2022
उझबेकिस्तानचे राष्ट्रपती महामहीम शौकत मिर्झीयोयेव्ह यांनी दिलेल्या आमंत्रणावरून, एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांच्या राष्ट्राध्यक्ष मंडळाच्या 22 व्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आगमन झाले.
पंतप्रधान मोदी यांचे समरकंद येथे आगमन झाल्यानंतर उझबेकिस्तानचे पंतप्रधान महामहिम अब्दुल्ला अरिपोव्ह यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. समरकंद प्रदेशाचे राज्यपाल, उझबेकिस्तान सरकारमधील अनेक मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.
आज 16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी पंतप्रधान मोदी एससीओ शिखर परिषदेत सहभागी होतील तसेच ते यावेळी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती आणि या परिषदेला उपस्थित असलेले इतर काही प्रमुख नेते यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होऊन चर्चा करणार आहेत.
***
Gopal C/Sanjana/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1859754)
Visitor Counter : 192
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam