निती आयोग
azadi ka amrit mahotsav

डेन्मार्क येथील कोपनहेगन येथे, जागतिक जल परीषदेत भारत आणि-डेन्मार्कच्या मंत्र्यांनी मिळून ‘भारतातील शहरी भागातील सांडपाण्याची परिस्थिती’ यावर प्रकाश टाकणारी श्वेतपत्रिका केली जारी

Posted On: 14 SEP 2022 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2022

 

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत,डेन्मार्कचे पर्यावरण मंत्री ली वर्मेलिन आणि डेन्मार्कचे  सहकार विकास  मंत्री फ्लेमिंग मोलर मोर्टेन्सन , यांनी  भारतीय शिष्टमंडळाच्या उपस्थितीत दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील इंटरनॅशनल वॉटर असोसिएशनच्या (IWA)जागतिक जल परीषद आणि प्रदर्शन 2022 यात 'भारतातील शहरी सांडपाणी परिस्थिती' या विषयावर श्वेतपत्रिका प्रकाशित केली.

अटल इनोव्हेशन मिशन (AIM), नीती  आयोग, जलशक्ती मंत्रालय आणि राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन (NMCG), इंटरनॅशनल एजन्सी इनोव्हेशन सेंटर डेन्मार्क (ICDK) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे,IITB) शैक्षणिक संस्था, यांच्या संयुक्त सहकार्याने एक आंतरशाखीय समूह स्थापन करुन त्यांनी शहरी सांडपाणी व्यवस्थापनावर ही श्वेतपत्रिका विकसित केली आहे.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी सर्व हितसंबंधितांचे प्रश्न लक्षात घेऊन, संपूर्ण भारतातील सांडपाणी प्रक्रियेची सद्यस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांची संरचना, सह-निर्माण आणि सहकार्यासाठी संभाव्य मार्गांच्या शक्यता लक्षात घेऊन या सर्व मुद्यांवर एकत्रितपणे विचार करून ही श्वेतपत्रिका तयार केली गेली आहे.

ही श्वेतपत्रिका भारत आणि डेन्मार्क यांच्यातील हरित हायड्रोजन,अक्षय ऊर्जा आणि सांडपाणी व्यवस्थापन आणि त्यांच्या द्विपक्षीय संबंधांवर लक्ष केंद्रित केलेल्या हरित धोरणात्मक भागीदारीचा परिणाम आहे.

या श्वेतपत्रिकेच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना, केंद्रीय जलशक्ती मंत्री, गजेंद्र सिंह म्हणाले, " जल व्यवस्थापनाचे संपूर्ण महत्त्व ओळखून,आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाण्याशी संबंधित विविध उपक्रम एका छत्राखाली आणून जलशक्ती मंत्रालय या नावाने एकात्मिक मंत्रालयाची 2019 मध्‍ये स्थापना केली. यामुळे भारतातील जल व्‍यवस्‍थापनेत अधिक समन्वय साधला जाऊन त्यात सुसंगती आली आहे आणि आम्ही जल क्षेत्रात 2024 पर्यंत 140 अब्जपेक्षा अमेरीकन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत. सरकारकडून केल्या जाणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीसोबतच, आम्ही समुदाय केंद्रित दृष्टिकोनही स्वीकारला आहे.  

 

S.Kulkarni /S.Patgoankar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(Release ID: 1859377) Visitor Counter : 252