उपराष्ट्रपती कार्यालय

"वसुधैव कुटुंबकम" ही संकल्पना आपल्या संस्कृतीविषयक विचारसरणीच्याच्या गाभ्याचे प्रतिनिधित्व करते -उपराष्ट्रपती


राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या (एनडीसी) 62 व्या तुकडीला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित

Posted On: 14 SEP 2022 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2022

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले की वसुधैव कुटुंबकमची संकल्पना (संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे असे मानणे) आपल्या संस्कृतीविषयक विचारसरणीच्या गाभ्याचे प्रतिनिधित्व करते.

नवी दिल्ली येथील एनडीसी अर्थात राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयात भारताची मुलभूत मूल्ये, रुची आणि उद्दिष्ट्ये या विषयावर व्याख्यान देताना उपराष्ट्रपती म्हणाले की आपल्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत  आपल्या अनेक मूलभूत मूल्यांचा  उल्लेख  आहे. कोविड-19 महामारीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या ‘व्हॅक्सीन मैत्री’ उपक्रमाचा संदर्भ देत ते म्हणाले की, संपूर्ण इतिहासाचा आढावा घेतला तर असे दिसते की भारताने कधीही विस्तारवादी दृष्टीकोन स्वीकारलेला नाही.

भारतातील रणनैतिक शिक्षणाच्या सर्वात सशक्त संस्थांपैकी एक असलेल्या एनडीसीची प्रशंसा करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, गेल्या सहा दशकांच्या काळात या महान संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा नावलौकिक तसेच मान अनेक पटीने वृद्धिंगत केला आहे.

एनडीसीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल मनोज कुमार मागो, शिक्षकवृंद तसेच 62 व्या तुकडीत सहभागी असलेले विद्यार्थी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

 

 

S.Kulkarni /S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859350) Visitor Counter : 197