आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 215 कोटी 67 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना देण्यात आलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रांची संख्या 4 कोटी 06 लाखांहून अधिक

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 45,749

गेल्या 24 तासांत देशात 5,108 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.71%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.70% आहे

Posted On: 14 SEP 2022 9:54AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 215 कोटी 67 लाखांचा (2,15,67,06,574) टप्पा ओलांडला आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटी 06 लाखांहून अधिक (4,06,90,829) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022पासून सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,672

2nd Dose

1,01,12,156

Precaution Dose

68,94,178

FLWs

1st Dose

1,84,35,766

2nd Dose

1,77,08,032

Precaution Dose

1,34,19,904

Age Group 12-14 years

1st Dose

4,06,90,829

2nd Dose

3,09,89,333

Age Group 15-18 years

1st Dose

6,18,18,801

2nd Dose

5,27,15,122

Age Group 18-44 years

1st Dose

56,09,68,415

2nd Dose

51,45,82,753

Precaution Dose

7,99,18,314

Age Group 45-59 years

1st Dose

20,39,74,478

2nd Dose

19,66,79,928

Precaution Dose

4,24,66,194

Over 60 years

1st Dose

12,76,30,750

2nd Dose

12,29,51,451

Precaution Dose

4,43,35,498

Precaution Dose

18,70,34,088

Total

2,15,67,06,574

 

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 45,749 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.1% आहे.

त्यामुळे, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.71% झाला आहे. गेल्या 24 तासांत 5,675 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारापासून पूर्णपणे रोगमुक्त झालेल्यांची संख्या आता 4,39,36,092.झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 5,108 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,55,231 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 02 लाखांहून अधिक (89,02,99,090) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.70% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.44%.इतका नोंदला गेला आहे.

***

GopalC/SanjanaC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859122) Visitor Counter : 178