वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सॅन फ्रान्सिस्को बे एरियातील उद्योग गुंतवणूकदारांशी साधला संवाद


भारताचे सायबर विश्व अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी सायबर सुरक्षा कंपन्यांनी भागीदारी करण्याचे आवाहन: गोयल

Posted On: 07 SEP 2022 10:42AM by PIB Mumbai

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये उद्योग गुंतवणूकदारांशी संवाद साधला.

 "सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये उद्योग भांडवलदारांशी एक आकर्षक संवाद साधला. प्रगतीपथावरील भारतीय स्टार्टअप परिसंस्थेत सहभाग आणि अधिक भागीदारीसाठी त्यांना प्रोत्साहित केले,” गोयल यांनी या बैठकीबद्दल असे ट्विट केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001CM0R.jpg


गोयल यांनी आज सॅनफ्रान्सिस्को येथे झेडस्केलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय चौधरी यांचीही भेट घेतली.

“भारताची डिजिटल क्षेत्रात वाढ होत असताना, अधिक सुरक्षित डिजिटल इंडिया सुनिश्चित करण्यासाठी देशात सायबर सुरक्षेचा आणखी विस्तार करण्याच्या मार्गांबद्दल चर्चा केली”, गोयल यांनी असे ट्विट केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002LN0P.jpg

 

गोयल यांनी ‘सर्व्हिस नाऊ’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल मॅकडरमॉट यांच्याशीही संवाद साधला.

“भारताने डिजिटल तंत्रज्ञान युगात प्रवेश करत असताना, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशीन लर्निंग सॉफ्टवेअरला सेवा (एसएएएस) बाजारपेठ म्हणून कसे बदलत आहे, आणि 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या प्रवासाला गती देत आहे याबद्दल चर्चा केली,” मंत्री महोदयांनी असे ट्विट केले.
 

गोयल यांनी आदल्या दिवशी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले होते.  TiE सिलिकॉन व्हॅली, आयआयटी स्टार्ट अप्स आणि इंडियन कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य दूतावासाने आयोजित केलेल्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमातही ते उपस्थित होते. दिवसाच्या उत्तरार्धात प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. बे एरिया भारत आणि भारतीय व्यवसाय तसेच स्टार्टअप देऊ करत असलेल्या संधीबद्दल खूप उत्साही आहे असे गोयल म्हणाले. भारताच्या 1.3 अब्ज लोकसंख्येच्या प्रचंड बाजारपेठेतही त्यांना मोठी क्षमता दिसते, असे मंत्री म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0031DGS.jpg


सायबर सुरक्षा कंपनी झेडस्केलरच्या मुख्‍य कार्यकारी अधिका-यांबरोबर  झालेल्या भेटीचा संदर्भ देत गोयल म्हणाले की, जग सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात आव्हानांचा सामना करत आहे. भारतीय उत्पादनांची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली, विशेषत: एक जिल्हा एक उत्‍पादन (ओडीओपी) या उपक्रमाचा जगभरात प्रचार केला जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

 

***

Suvarna B./Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857363) Visitor Counter : 124