खाण मंत्रालय

कोळसा आणि खाण मंत्रालयाने हैदराबाद येथे आयोजित केली खाण मंत्र्यांची दोन-दिवसीय राष्ट्रीय परिषद

Posted On: 06 SEP 2022 11:23AM by PIB Mumbai

कोळसा मंत्रालय आणि खाण मंत्रालय 9 आणि 10 सप्टेंबर 2022 रोजी हैदराबाद येथे खाण मंत्र्यांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करणार आहे. देशातील खनिज उत्खननाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी धोरण आखणे आणि खाण क्षेत्रात केंद्रसरकारने नुकत्याच केलेल्या धोरणात्मक सुधारणांचे मूल्यांकन करणे, हा या परिषदेचा उद्देश आहे.

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, खाण, कोळसा आणि रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे, कोळसा सचीव, खाण सचीव, विविध राज्यांचे मंत्री, प्रधान सचीव (खाण) आणि डीजीएम/ डीएमजी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या महत्वाच्या परिषदेला उपस्थित राहतील.

पुढील 25 वर्षांत खनिजांची जागतिक मागणी सध्याच्या उत्पादनापेक्षा जास्त होईल हे लक्षात घेता, देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये खनिज क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे, खाण मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद राज्य सरकारांना खाण क्षेत्रात येणाऱ्या अडचणी मांडण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ ठरेल. खाण मंत्रालय आणि विविध राज्य सरकारांमधील संबंध दृढ करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

परिषदेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये, खाण क्षेत्रात केलेले प्रयत्न आणि राज्य सरकारांकडून राष्ट्रीय खननकर्म ट्रस्टच्या (NMET) निधीचा प्रभावी वापर याबाबतची चर्चा, कर्नाटक, ओदिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात या राज्य सरकारांद्वारे सादरीकरण, राज्य सरकारांद्वारे लिलावाच्या सद्यःस्थितीचे सादरीकरण आणि अधिसूचित खासगी खनिज उत्खनन संस्थांबरोबरचा (NPEAs) संवाद, याचा समावेश आहे.

परिषदेच्या दुसर्‍या दिवशी, कोळसा मंत्रालय विविध सादरीकरणांच्या माध्यमातून कोळसा क्षेत्रातील सुधारणा आणि त्यांचे परिणाम, कोळसा खाण प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्याबाबतचा दृष्टीकोन आणि कोळसा लॉजिस्टिक याची माहिती देईल. यापूर्वी वितरीत करण्यात आलेल्या कोळसा खाणींचे कार्यांन्वयन आणि त्यांची सध्याची स्थिती यावर देखील या परिषदेत भर दिला जाईल.

राज्य सरकारांचे खाण मंत्री, कोळसा मंत्रालयाचे सचीव, डॉ. अनील कुमार जैन आणि कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल दुसर्‍या दिवशी परिषदेला संबोधित करतील.

***

GopalC/RAgashe/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857122) Visitor Counter : 232