वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
गोयल यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली
सॅन फ्रान्सिस्को येथील गदर मेमोरियल हॉलला दिली भेट; बलिदानाचे केले स्मरण
Posted On:
06 SEP 2022 8:52AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहिली.

आपल्या ट्वीटर संदेशात ते म्हणाले, “आपण काय करतो आणि आपण काय करण्यासाठी सक्षम आहोत यामधील फरक लक्षात घेऊन कार्य केल्यास ते, जगातल्या बहुतांश समस्या सोडवण्यासाठी पुरेसे ठरेल.”

“सॅन फ्रान्सिस्कोमध्ये महात्मा गांधी यांना आदरांजली वाहत असताना ते म्हणाले की, " मला अधिक न्याय्य आणि समृद्ध जगाला आकार देण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा आणि क्षमतांचा अभिमान वाटतो.”
त्यानंतर गोयल यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील गदर मेमोरियल हॉलला भेट दिली.
आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचे स्मरण करत गोयल म्हणाले, “आपल्या प्रिय मातृभूमीसाठी ‘सर्वस्व’ अर्पण करणाऱ्या आपल्या पूर्वजांप्रति कृतज्ञतेची भावना मनात ठेवून मी आज या गदर स्मारकाला भेट देत आहे.
या ‘अमृत काळात’ एक विकसित आणि समृद्ध देश बनण्यासाठी भारताची सेवा करण्याचे मी वचन देतो.
जय हिंद!”


अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिस येथील भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंच परिषद आणि इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्कच्या (IPEF) मंत्री स्तरावरच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी श्री गोयल 5 ते 10 सप्टेंबर 2022 या काळात परदेश दौऱ्यावर आहेत.
***
Gopal C/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1857095)
Visitor Counter : 156