आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 213 कोटी 72 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना देण्यात आलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रांची संख्या 4.04 कोटींहून अधिक

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 52,336

गेल्या 24 तासांत देशात 4,417 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.69% टक्के

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.06 टक्के

Posted On: 06 SEP 2022 9:42AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 213 कोटी 72 लाख मात्रांचा (2,13,72,68,615) टप्पा ओलांडला आहे.

 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरु झाली. आतापर्यंत 4.04 कोटींहून अधिक (4,04,84,204) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याची मोहीम देखील 10 एप्रिल 2022पासून सुरु करण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,325

2nd Dose

1,01,09,049

Precaution Dose

68,17,643

FLWs

1st Dose

1,84,35,070

2nd Dose

1,77,03,207

Precaution Dose

1,32,64,802

Age Group 12-14 years

1st Dose

4,04,84,204

2nd Dose

3,05,22,195

Age Group 15-18 years

1st Dose

6,17,35,783

2nd Dose

5,24,94,179

Age Group 18-44 years

1st Dose

56,07,49,340

2nd Dose

51,37,48,879

Precaution Dose

6,95,58,309

Age Group 45-59 years

1st Dose

20,39,35,950

2nd Dose

19,64,80,537

Precaution Dose

3,81,09,335

Over 60 years

1st Dose

12,76,04,209

2nd Dose

12,28,16,146

Precaution Dose

4,22,85,453

Precaution Dose

17,00,35,542

Total

2,13,72,68,615

 

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 52,336 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.12 टक्‍के आहे.

त्यामुळे, भारतातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.69 टक्‍के झाला आहे. गेल्या 24 तासांत 6,032 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले आहेत. देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,38,86,496 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 4,417 कोविड रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,67,490 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 88 कोटी 77 लाखांहून अधिक (88,77,46,764) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.06% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.20 % इतका नोंदला गेला आहे.

***

GopalC/BS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857037) Visitor Counter : 132