विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
गुजरात विज्ञान सम्मेलनाच्या आयोजनाचा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतला आढावा
10 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार्या सायन्स सिटी अहमदाबाद, येथील दोन दिवसीय संमेलनाच्या तयारीचा केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी घेतला आढावा
Posted On:
04 SEP 2022 4:07PM by PIB Mumbai
सायन्स सिटी अहमदाबाद येथे राज्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या विज्ञान संमेलनात केंद्राच्या सहकार्याने एकात्मिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक पद्धतींचाअवलंब करून विकासासाठी राज्यांच्या गरजेनुसार विशिष्ट तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा शोध घेतला जाईल.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी 10 सप्टेंबर 2022 रोजी सुरू होणाऱ्या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हच्या तयारीचा सखोल आढावा घेतल्यानंतर माध्यमांना ही माहिती दिली.
***
G.Chippalkatti/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
***
(Release ID: 1856655)
Visitor Counter : 161