आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताचे समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 212 कोटी 39 लाख पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 4 कोटी 03 लाखांहून अधिक पाहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 64,667

गेल्या 24 तासांत देशात 7,231 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.67%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.55% आहे

Posted On: 31 AUG 2022 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2022

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 212.39 कोटींचा (2,12,39,92,816) टप्पा ओलांडला आहे. 16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटी 03 लाखांहून अधिक (4,03,22,642) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,074

2nd Dose

1,01,06,483

Precaution Dose

67,54,006

FLWs

1st Dose

1,84,34,563

2nd Dose

1,76,98,575

Precaution Dose

1,31,46,365

Age Group 12-14 years

1st Dose

4,03,22,642

2nd Dose

3,02,03,121

Age Group 15-18 years

1st Dose

6,16,78,588

2nd Dose

5,23,28,239

Age Group 18-44 years

1st Dose

56,05,85,613

2nd Dose

51,30,84,139

Precaution Dose

6,26,98,575

Age Group 45-59 years

1st Dose

20,39,04,016

2nd Dose

19,63,16,182

Precaution Dose

3,51,48,276

Over 60 years

1st Dose

12,75,80,356

2nd Dose

12,27,08,638

Precaution Dose

4,08,80,365

Precaution Dose

15,86,27,587

Total

2,12,39,92,816

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 64,667 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.15% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.67% झाला आहे. गेल्या 24 तासांत 10,828 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,38,35,852 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 7,231 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,52,166 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 88 कोटी 58 लाखांहून अधिक (88,58,81,136) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.55% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.05% इतका नोंदला गेला आहे.

 

* * *

G.Chipalkatti/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855751) Visitor Counter : 173