कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोणत्याही व्होट बँकेचा विचार न करता गेल्या 8 वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या कल्याणकारी योजना तळागाळातील गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचल्या- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2022 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भू विज्ञान (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अवकाश राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की गेल्या 8 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजना कोणत्याही मतपेटीचा विचार न करता तळागाळातील गरजू व्यक्ती पर्यंत पोहोचल्या.

उत्तरप्रदेशमध्ये मैनपुरी येथे “लाभार्थी” आणि पीआरआय, डीडीसी, बीडीसी आणि नगर परिषदेचे सभापती आणि सदस्यांबरोबर लागोपाठ आयोजित बैठकींना संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, प्रत्येक गरीबाभिमुख आणि लोककल्याणकारी योजना अशा रीतीने तयार करण्यात आली होती, की कुठलीही जात, पंथ, धर्म अथवा मतपेटी यांचा विचार न करता ती सर्वात जास्त गरजू अथवा तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचेल.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PM-GKAY), पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, हर घर जल, उज्जवला, शौचालय, जन धन, आयुष्मान योजना यासारख्या लोक-केंद्रित योजना, कोणत्याही राजकीय विचाराशिवाय आणि अन्य विचाराशिवाय प्रत्येक घरात पोहोचल्या असून, “सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, आणि सब का प्रयास” या तत्त्वाचे आचरण करत समाजातील गरजू आणि वंचित घटकांना लक्ष्य करण्याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली. ते म्हणाले, कुठल्याही भेदभावाशिवाय गरजूंना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असून, पूर्वी लोकानुनायाचे धोरण प्रचलित होते, त्यापेक्षा हे वेगळे आहे. या कल्याणकारी उपाययोजनांनी कोट्यवधि लोकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढले आणि त्यांना सन्मानाचे जीवन दिले, याचा मंत्र्यांनी विशेष उल्लेख केला.

* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1855585)
आगंतुक पटल : 159