राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 30 AUG 2022 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2022   

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे, “ गणेश चतुर्थीच्या मंगल  प्रसंगी मी भारतामध्ये आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना शुभेच्छा देते.

गणेश चतुर्थीचा हा सण, बुद्धी, समृद्धी  आणि भाग्याचे प्रतीक असलेल्या भगवान गणेशाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. भगवान गणेशाला विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती असे म्हटले जाते.

सद्भाव आणि सौहार्द राखण्यासाठी आपण श्री गणेशाच्या आशीर्वादाची याप्रसंगी प्रार्थना करूया. जगात शांतता आणि आनंद कायम राहो अशी आपण प्रार्थना करूया.”

राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1855564) Visitor Counter : 142