संरक्षण मंत्रालय

भारत आता दुर्बल नव्हे तर कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आणि सामर्थ्यवान - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह


"भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही किंवा एक इंचही परकीय भूमी काबीज केलेली नाही, मात्र जर कोणी वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर मिळेल"

Posted On: 30 AUG 2022 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे  एक सामर्थ्यवान , आत्मविश्वासपूर्ण आणि आत्मनिर्भर भारतामध्ये परिवर्तन झाले असून कोणत्याही  प्रकारच्या धोक्यांना आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी हा भारत   पूर्णपणे सज्ज आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 30 ऑगस्ट 2022 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे एका कार्यक्रमात केले. सरकारने  गेल्या आठ वर्षांत उचललेल्या पावलांमुळे सशस्त्र दलांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही किंवा  एक इंचही परकीय भूमी काबीज केलेली नाही, मात्र देशाचे  सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

''भारत आता दुबळा  राहिलेला नाही, हा गेल्या आठ वर्षांचा परिणाम आहे. जेव्हा आपल्या सशस्त्र दलांनी विलक्षण  पराक्रम दाखवत 2016 मध्ये लक्ष्यभेदी कारवाई   आणि 2019 मध्ये बालाकोटवर हवाई हल्ले केले तेव्हाच आपण दहशतवादाबाबतची आपली  भूमिका स्पष्ट केली आहे. भारताची लष्करी निपुणता  कोणत्याही देशापेक्षा कमी नाही याचा हा पुरावा होता,” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारताचा' पाया घातला गेला असून  त्यांच्या संकल्पनेतील  सक्षम  आणि आत्मनिर्भर  ‘नव भारत ’ शक्तिशाली देशांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत आहे , असे प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी केले. संरक्षण क्षेत्रात  ‘आत्मनिर्भरतेला' प्रोत्साहन देण्यासाठी, 310 वस्तूंच्या तीन सकारात्मक स्वदेशीकरण सूची  जारी करणे आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये देशांतर्गत उद्योगांसाठी भांडवली खरेदी खर्चासाठी  68 टक्के तरतूद राखून ठेवण्यासह संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या अनेक पावले त्यांनी नमूद केली.  देशांतर्गत संरक्षण उद्योगाला बळकटी देण्यासाठी ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या दृष्टीकोना अंतर्गत परदेशी कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे, असे ते म्हणाले.

भारत केवळ स्वतःच्या गरजा भागवत नाही तर इतर देशांच्या गरजाही पूर्ण करत आहे त्यामुळे सरकार करत असलेल्या  प्रयत्नांना फळ मिळू लागले आहे याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले.
 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1855517) Visitor Counter : 171