ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

वजन आणि मोजमाप उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या 63 उत्पादक/आयातदारांना अनुपालन तपशील दाखवण्यासाठी केंद्र सरकारने बजावली कारणे दाखवा नोटीस

Posted On: 30 AUG 2022 10:44AM by PIB Mumbai

केंद्र सरकारने  कायदेशीर मेट्रोलॉजी विभागाअंतर्गत वजन आणि मोजमाप उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या 63 उत्पादक/आयातदारांना अनुपालन तपशील दाखवण्यासाठी  कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर असलेल्या  उत्पादक/ आयातदार / विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनाच्या मॉडेलच्या मान्यतेचा तपशील, उत्पादक/ आयातदार / विक्रेता परवाना आणि वजनाच्या उपकरणांची पडताळणी करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे.

ई-कॉमर्स माध्यमावर ,वजन आणि मोजमाप उपकरणांचे काही उत्पादक / आयातदार, ग्राहकांना  कायद्याच्या तरतुदींचे पालन न करता वजन आणि मोजमाप उपकरणे विकत आहेत, असे आढळून आले आहे . ई-कॉमर्स माध्यमावरील या अशा नियमबाह्य विक्रीमुळे सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून सरकारच्या महसूल उत्पन्नातही नुकसान  होत आहे.

ग्राहकांचे हित आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी  वजन आणि मोजमाप उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या 63 उत्पादक/आयातदारांना त्यांच्या वजन आणि मापन यंत्राच्या मॉडेलसाठी  (कलम 22 अन्वये ) मान्यता घेणे आवश्यक आहे, उत्पादन परवाना (कलम 23)/ आयातदार नोंदणी (कलम 19), आणि कायदेशीर मेट्रोलॉजी कायदा, 2009 अंतर्गत वजन आणि मापन यंत्राचे सत्यापन/मुद्रांक (कलम 24) करणे आवश्यक आहे.

याशिवाय वजन आणि मापन उपकरणांवर  पॅकेज पूर्व स्थितीत  नमूद केलेल्या तसेच ई कॉमर्स माध्यमावर जाहीर केलेल्या घोषणांचे  कायदेशीर मेट्रोलॉजी (पॅकेज केलेल्या वस्तू), नियम 2011 च्या  तरतुदींनुसार (नियम 6) पालन करणे आवश्यक आहे.

वजन आणि मापन उपकरणांच्या मॉडेल साठी मान्यता घेणे, उत्पादक परवाना / आयातदार नोंदणी आणि वजन आणि मापन उपकरणांचे सत्यापन/मुद्रांक  या गोष्टी ग्राहकांच्या हितासाठी अनिवार्य करण्यात आल्या असून त्याचबरोबर वजन, मापे किंवा संख्येनुसार विकल्या जाणार्‍या वजन, मापे आणि इतर वस्तूंमधील व्यापार आणि उद्योगावर नियंत्रण ठेवण्याचा देखील उद्देश आहे. याशिवाय ग्राहकांना योग्य माहिती देऊन त्यांना वस्तूची  निवड करणे सुलभ व्हावे याकरता वस्तूच्या प्री-पॅकेज वर  /ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादनाची अनिवार्य घोषणा करणे आवश्यक आहे.

उत्पादक/ आयातदाराने विकलेल्या वजन आणि मापन उपकरणांची नोंद ठेवणे तसेच त्यांचे उत्पादित/आयात केलेले, विकलेले/वितरित केलेले भाग आणि सरकारला भरलेल्या  शुल्काची पडताळणी करणे आवश्यक आहे.

कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्यातील या तरतुदींचे उल्लंघन केल्यास कलम 32 ( उत्पादनाच्या मॉडेलला मान्यता मिळाली नसल्यास ), कलम 45 (परवान्याशिवाय वजन आणि मापे  तयार केल्याबद्दल दंड) अंतर्गत हे कृत्य दंडनीय आहे. कलम ३८ (नोंदणी न केल्याबद्दल  वजन किंवा माप आयातदाराला  दंड), कलम 33 (असत्यापित वजन किंवा माप वापरण्यासाठी दंड) आणि आणि कलम 36 (अप्रमाणित  पॅकेजेसची विक्री केल्याबद्दल दंड )  याकरता दंड किंवा  कारावास किंवा दोन्हींची तरतूद आहे.

***

Jaydevi PS/B.Sontakke/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1855424) Visitor Counter : 233