रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
देशभरात आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना(आयडीपी) वितरीत करताना नागरिकांना अधिक सुलभता प्रदान करण्यासाठीची अधिसूचना जारी
Posted On:
29 AUG 2022 2:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2022
देशभरात आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना (आयडीपी)वितरीत करताना नागरिकांना अधिक सुलभता प्रदान करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2022 रोजी अधिसूचना जारी केली आहे.
भारत हा 1949 च्या आंतरराष्ट्रीय रस्ते वाहतुकीसंदर्भातील करारावर स्वाक्षरी केलेला (जिनेव्हा करार)देश असल्यामुळे, इतर देशांसोबत परस्पर आधारावर स्वीकृतीसाठी, या करारांतर्गत प्रदान केल्यानुसार तरतुदींनुसार आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना(आयडीपी)वितरीत करणे आवश्यक आहे.
भारतातील राज्यांमध्ये सध्या वितरीत केल्या जाणार्या आयडीपीचे स्वरूप, आकार, नमुना, रंग इ.भिन्न आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना परदेशात संबंधित आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवान्यासाठी(आयडीपी)अडचणी येत होत्या.
आता करण्यात आलेल्या या सुधारणेच्या माध्यमातून, संपूर्ण भारतात वितरीत करण्यात येणाऱ्या आयडीपीचे स्वरूप, आकार, रंग इ. जिनिव्हा कराराचे पालन करून. प्रमाणित करण्यात आले आहे. आयडीपीला वाहन चालक परवान्याशी जोडण्यासाठी क्यूआर कोडची तरतूदही करण्यात आली आहे. नियामक प्राधिकरणांच्या सुविधेसाठी विविध करार आणि केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 मधील वाहन श्रेणींचा तुलनात्मक संदर्भ देखील यात समाविष्ट करण्यात आला आहे. मदत क्रमांक आणि ईमेलही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1855235)
Visitor Counter : 268