युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा ‘मीट द चॅम्पियन’ उपक्रम 25 हून जास्त शहरांमध्ये राबवला जाणार


भारतीय क्रीडा प्राधिकरण हा उपक्रम, देशातील सर्व केंद्रांमध्ये क्रीडाविषयक कार्यक्रमासह साजरा करणार

Posted On: 28 AUG 2022 9:36PM by PIB Mumbai

 

29 ऑगस्ट रोजी असणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय देशभरातील 26 शाळांमध्ये *'मीट द चॅम्पियन'* (अजिंक्य वीरांची भेट) या उपक्रमाचं आयोजन करणार आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेतली सुवर्णपदक विजेती निखत जरीन, पॅरालिम्पिक  आणि राष्ट्रकुल पदक विजेती भाविना पटेल, टोकियो ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेता मनप्रीत सिंग हे काही प्रमुख खेळाडू, या उपक्रमात सहभागी असतील.

मीट द चॅम्पियन्स' ही एक अनोखी अशी, मान्यवर खेळाडूंनी शाळांना भेट देण्याची मोहीम आहे, जी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी शाळेला दिलेल्या भेटीनं सुरू झाली होती आणि गेल्या काही महिन्यांत ही मोहीम देशाच्या विविध भागात पोहोचली आहे.  शाळांना दिलेल्या या भेटीदरम्यान, मान्यवर चॅम्पियन्स त्यांचे अनुभव, यशस्वी जीवनासाठीचे धडे आणि योग्य आहार कसा घ्यावा याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देतात, तसच शाळेतील मुलांना प्रेरणादायी प्रोत्साहन देतात.

हॉकीचे जादूगार  मेजर ध्यानचंद यांना आदरांजली म्हणून साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) या उपक्रमात, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धां मधल्या विजेत्या खेळाडूंनाही सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणया वर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन, फिट इंडिया  (तंदुरुस्त भारत) मोहिमेचा एक भाग म्हणून, 'सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी खेळ' ही संकल्पना असलेल्या क्रीडा स्पर्धा संपूर्ण भारतभर भरवून, साजरा करणार आहे. विविध वयोगट आणि सर्व स्तरातील लोकांसाठी व्यावसायिक तसच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश असलेले विविध स्तरांवरचे क्रीडा उपक्रम, या निमित्तानं आयोजित करण्यात आले आहेत.

संध्याकाळी, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्री निशिथ प्रामाणिक हे देखीलक्रीडाजगत आणि फिट इंडिया मोहिमेतल्या काही नामांकित व्यक्तिमत्त्वांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष संवाद साधतील.  भारतासाठी असलेलं, खेळ आणि तंदुरुस्तीचं महत्व, याबाबत ते  या संवादात चर्चा करतील.

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855110) Visitor Counter : 192