आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतात कोविड-19 च्या एकंदर लसमात्रांची संख्या 211 कोटी 39 लाखांच्यावर


12 ते 14 वर्षे वयोगटात, चार कोटी दोन लाखांहून जास्त जणांना पहिली लसमात्रा

देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 87 हजार 311

गेल्या 24 तासात देशभरात 9,520 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्णं बरे होण्याचा दर सध्या 98.62 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.80%

Posted On: 27 AUG 2022 11:03AM by PIB Mumbai

 

आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार, भारतात कोविड-19 च्या लसमात्रांची संख्या 211 कोटी 39 लाखांवर(2 अब्ज  11 कोटी 39 लाख 81 हजार  444) पोहोचली आहे. 2 कोटी 81 लाख, 63 हजार, 153 सत्रांच्या माध्यमातून हे लसीकरण झाले आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटासाठी कोविड 19 लसीकरण, 16 मार्च 2022 रोजी सुरू झालं.  आतापर्यंत चार कोटी दोन लाखाहून जास्त (4 कोटी 02 लाख, 11 हजार, 871) मुलांना कोविड-19 लसीची पहिली मात्र मिळाली आहे.  त्याच प्रमाणे 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी कोविड -19 लसीची वर्धक मात्रा 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,13,895

2nd Dose

1,01,05,160

Precaution Dose

67,10,709

FLWs

1st Dose

1,84,34,271

2nd Dose

1,76,96,064

Precaution Dose

1,30,61,656

Age Group 12-14 years

1st Dose

4,02,11,871

2nd Dose

2,99,97,546

Age Group 15-18 years

1st Dose

6,16,37,810

2nd Dose

5,22,24,659

Age Group 18-44 years

1st Dose

56,04,62,254

2nd Dose

51,26,54,256

Precaution Dose

5,74,20,993

Age Group 45-59 years

1st Dose

20,38,80,512

2nd Dose

19,62,18,466

Precaution Dose

3,28,10,047

Over 60 years

1st Dose

12,75,66,034

2nd Dose

12,26,46,052

Precaution Dose

3,98,29,189

Precaution Dose

14,98,32,594

Total

2,11,39,81,444

 

भारतातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 87 हजार 311 एवढी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देशातल्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या 0.20% आहे.

भारतातला कोरोनातून  बरे होण्याचा दर 98.62% आहे. देशात गेल्या 24 तासात 12 हजार 875 कोरोना रुग्ण  बरे झाले आणि देशातल्या बरे झालेल्या कोरोना रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 4,37,83,788 आहे.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 9 हजार 520 रुग्णांची नोंद झाली.

देशात गेल्या 24 तासात कोविड 19 च्या एकूण तीन लाख 81 हजार 205 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकंदर 88 कोटी 47 लाखाच्या वर (88 कोटी 47 लाख 20 हजार 250) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातला साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.80%, तर दैनिक पॉझिटिव्हीटी दर  2.50% आहे.

***

A.Chavan/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1854804) Visitor Counter : 135