आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
'कोविड लसीकरण अमृत महोत्सव’, एक लोकचळवळ म्हणून जनसमुदायासह मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीया
211 कोटींहून अधिक लसमात्रा हे लोक सहभागातून अभिव्यत होणाऱ्या देशाच्या सामूहिक इच्छाशक्तीचे प्रदर्शन
कोविड लसमात्रा देण्याची दैनंदिन सरासरी सुमारे 28 लाख
देशभरात 8.8 लाखांहून अधिक विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन
Posted On:
26 AUG 2022 5:41PM by PIB Mumbai
देशात आत्तापर्यंत 211 कोटीहून अधिक कोविड लसमात्रा दिल्या गेल्या असून त्यामुळे भारताने राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत महत्त्वाचा मैलाचा दगड पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक आणि प्रगतीशील नेतृत्वाखाली देशाची सामूहिक इच्छाशक्ती या लोकसहभागातून दिसून आली आहे, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी कोविड लसीकरणाच्या या लक्षणीय टप्प्याचा गौरव स्वागत केला आहे.
"कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी माध्यम आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे भारतातील लसीकरणाची व्याप्ती वाढेल आणि एक निरोगी राष्ट्र निर्माण होईल."असे पंतप्रधानांनी ट्विट संदेशामध्ये म्हटले आहे.
राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून प्रतिबंधात्मक मात्रा घेण्याला चालना देण्यासाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' मोहीम 15 जुलै 2022 रोजी सुरू करण्यात आली. या मोहिमेंतर्गत, सर्व सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर 18 वर्षे व त्यावरील व्यक्तींना 75 दिवसांसाठी (15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022) खबरदारीची लसमात्रा मोफत दिली जात आहे.
आज या मोहिमेचा 42 वा दिवस असून आजपर्यंत एकूण 14.7 कोटी प्रतिबंधात्मक लसमात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये मोहिमेदरम्यान देण्यात आलेल्या अतिरिक्त 9.6 कोटी मात्रांचा समावेश आहे.
मोहीम सुरू होण्याच्या आधी प्रतिदिन (15 दिवसांच्या)11.4 लाख लसमात्रा देण्याचे सरासरी प्रमाण 27.77 लाख लसमात्रांपर्यंत वाढलं आहे. प्रतिबंधात्मक लसमात्रांची दैनंदिन सरासरी प्रतिदिन 22 लाख लसमात्रा इतकी झाली आहे.
आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्यात, नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनच्या (एनटीएजीआय) च्या शिफारशीसह, राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमात कॉर्बेव्हॅक्सचा समावेश विषम प्रतिबंधात्मक लसमात्रा म्हणून करण्यात आला आहे, जो कोवॅक्सिन किंवा कोविशील्डच्या दुसऱ्या डोसनंतर घेतला जाऊ शकतो. मोहिमेदरम्यान सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी लसी उपलब्ध केल्या आहेत. प्रतिबंधात्मक लसमात्रा आता 6 महिन्यांनंतर (दुसऱ्या डोसनंतर 26 आठवड्यांनी) घेता येईल.
'कोविड लसीकरण अमृत महोत्सव' 'लोक चळवळ' म्हणून राबविण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनीही हातभार लावला आहे. लसीकरण शिबिरांच्या माध्यमातून या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर जनप्रतिसाद लाभला आहे. या अंतर्गत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत आतापर्यंत 8,86,585 हून अधिक विशेष लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
***
R.Aghor/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854720)
Visitor Counter : 411