कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम 2.0 आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठीच्या विशेष मोहिमेच्या तयारीचा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतला आढावा

Posted On: 26 AUG 2022 5:55PM by PIB Mumbai

 

2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भारत सरकारच्या कार्यलयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिम 2.0 आणि प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठीच्या विशेष मोहिमेच्या तयारीचा, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आढावा घेतला.

2021 मध्ये आयोजित केलेल्या मोहिमेच्या धर्तीवर, केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भारत सरकारची मंत्रालये/विभागांमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठीच्या विशेष मोहिमेसह स्वच्छता मोहीम 2022 ची घोषणा केली आहे. ही विशेष मोहीम 2.0 च्या माध्यमातून ,मंत्रालय/ विभाग आणि त्यांच्या संलग्न/ अंतर्गत  कार्यालयांव्यतिरिक्त बाह्य ठिकाणी असलेल्या  कार्यालयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे

ही मोहीम  यशस्वी करण्यासाठी  वैयक्तिक सहभाग द्यावा असे भारत सरकारच्या सर्व सचिवांना कॅबिनेट सचिवांनी  पत्र लिहून कळवले आहे. सर्व सचिवांनी त्यांच्या मंत्रालयांतर्गत कार्यालये आणि संस्थांना विशेष मोहीम 2.0 ची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी योग्य त्या सूचना जारी करण्याचा सल्ला कॅबिनेट सचिवांनी दिला आहे.  या मोहिमेसाठी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी ) हा नोडल विभाग म्हणून काम करेल  आणि विशेष मोहिम 2.0 च्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल. या विशेष मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आणि या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने  तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या  आहेत.

2 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केलेल्या पहिल्या स्वच्छता मोहिमेचा आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठीच्या विशेष मोहिमेचा, ही मोहीम पुढील भाग आहे.  प्रत्यक्ष स्थिती दाखवणाऱ्या  डॅशबोर्डच्या  (www.pgportal.gov.in/scdpm) माध्यमातून  2021 मध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेवर लक्ष ठेवण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व मंत्रालये/विभागांना अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धतींमधून शिकण्यासाठी एकाच परस्परसंवादी व्यासपीठावर आणण्यात आले होते. विशेष मोहीम 1.0 च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या  कमी झाली आणि कार्यालयीन जागांचे कार्यक्षम व्यवस्थापन दिसून आले.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1854696) Visitor Counter : 183