शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान चार दिवसांच्या ॲास्ट्रेलिया दौ-यावर; भारत आणि ॲास्ट्रेलिया यांच्यात शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात सहकार्य, सहयोगाच्या संधी विकसित करण्याचा प्रयत्न
Posted On:
20 AUG 2022 8:08PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान चार दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शिक्षण आणि कौशल्य विकासातील संबंध, सहयोग आणि सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या संधी विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
या दौऱ्यासाठी जाण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात, प्रधान म्हणाले की, भारताच्या शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या नूतनीकरणाचा दोन्ही देशांना फायदा होईल. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था उभारण्याची मोठी संधी यामुळे उपलब्ध होईल. तसेच या दौर्यामुळे आमच्या समान ध्येय साध्य करण्यासही गती मिळेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ज्ञानाचा सेतू उभारण्यास मदतही होईल. शिक्षण, कौशल्य, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रांत सर्व स्तरांवर आमची प्रतिबद्धता आणि ज्ञान अधिक व्यापक होईल. त्याचप्रमाणे आपल्या या चार दिवसांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांचे परस्पर संबंध दृढ़ होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
21 ऑगस्ट रोजी प्रधान हे तेथील भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकांशी संवाद साधतील. दुसऱ्या दिवशी, प्रधान, ऑस्ट्रेलियाच्या शिक्षणमंत्री जेसन क्लेअर यांच्यासह, भारत-ऑस्ट्रेलिया शिक्षण परिषदेच्या वेस्टर्न सिडनी विद्यापीठात होणा-या 6व्या बैठकीला सह-अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील.न्यू साउथ वेल्सच्या शिक्षण मंत्री सारा मिशेल यांच्यासोबत, प्रधान तेथील एका शाळेला भेट देतील. ते सिडनी येथील TAFE NSF आणि न्यू साउथ वेल्स विद्यापीठाला (UNSW) देखील भेट देतील. या भेटीत ते ऑस्ट्रेलियातील विविध विद्यापीठातील कुलगुरू आणि ऑस्ट्रेलियन शासनाच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधतील. यानंतर ते ऑस्ट्रेलिया इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि मोनाश विद्यापीठाने आयोजित केलेल्या बैठकीला संबोधित करतील. त्यानंतर प्रधान हे मेलबर्न इथं भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
***
R.Aghor/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1853352)
Visitor Counter : 162