युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय फुटबॉल क्लबना एएफसी स्पर्धा खेळू देण्याची क्रीडा मंत्रालयाची  फिफा आणि एएफसीला  विनंती

Posted On: 19 AUG 2022 6:43PM by PIB Mumbai

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने खेळाडू प्रथमहा दृष्टीकोन ठेवत, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना  (फिफा) आणि आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) यांच्याशी संपर्क साधला असून, श्री गोकुलम केरळ एफसी आणि एटीके मोहन बागान, या भारतीय फुटबॉल क्लबना (संघांना) नियोजित स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

फिफा द्वारे एआयएफएफच्या निलंबनाची घोषणा होण्या पूर्वीच श्री गोकुलम केरळ एफसी, ऑगस्ट 23  रोजी इराण विरोधातला नियोजित सामना तसेच ऑगस्ट 26 रोजी यजमान देशाने दक्षिण उझबेकिस्तानमधील कुरेशी शहरात आयोजित केलेला सामना खेळण्यासाठी उझबेकिस्तान येथे पोहोचला आहे, तर एटीके मोहन बागान संघ सप्टेंबर 7 रोजी बहारीन येथे एएफसी कप 2022 (इंटर-झोन उपांत्य फेरी) सामना खेळणार आहे.  

फिफा आणि एएफसीला लिहिलेल्या ईमेल मध्ये क्रीडा मंत्रालयाने हे अधोरेखित केले आहे की, फिफाने एआयएफएफच्या निलंबनाची घोषणा केली तेव्हा श्री गोकुलम केरळ एफसी संघ आधीच उझबेकिस्तानमध्ये होता. त्यामुळे फिफा आणि एएफसीने युवा खेळाडूंचे हित लक्षात घेऊन संघाला एएफसी महिला क्लब चॅम्पियनशिप (पश्चिम क्षेत्र) स्पर्धेत खेळायची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, या संघाला सर्व प्रकारची मदत मिळावी, यासाठी मंत्रालयाने उझबेकिस्तानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. मंत्रालय गोकुलम संघाच्या व्यवस्थापनाच्या देखील सतत संपर्कात आहे.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1853183) Visitor Counter : 171