नौवहन मंत्रालय

चाबहार बंदराला भेट देण्यासाठी तसेच इराणच्या मंत्र्यांसमवेत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचा इराण तसेच संयुक्त अरब अमिरातीचा दौरा

Posted On: 18 AUG 2022 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑगस्‍ट 2022

 

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष विभागाचे मंत्री सर्वानंद सोनोवाल आज म्हणजे  18 ऑगस्ट 2022 पासून इराण तसेच संयुक्त अरब अमिराती या देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात केंद्रीय मंत्री इराण येथील चाबहारच्या शहीद बेहेश्ती बंदराला तसेच जेबेल अली बंदरासह संयुक्त अरब अमिरातीला देखील भेट देतील. चाबहार बंदर हा देशाचा पहिला परदेशी बंदर प्रकल्प आहे. चाबहार बंदर प्रकल्प हा भारतासाठी राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्व असलेला प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे.

जागतिक महामारीच्या संकटामुळे भारतातून इराणमध्ये  आणि इराणकडून भारतामध्ये  होणाऱ्या  भेटींची संख्या कमी झाली होती. आता होत असलेला मंत्रीस्तरीय दौरा या दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध आणि सागरी सागरी संबंध अधिक मजबूत करेल. युरोप, रशिया आणि स्वतंत्र देशांच्या राष्ट्रकुल मंडळातील देश यांच्याशी भारतीय व्यापाराचा महत्त्वाचा मार्ग म्हणून चाबहार बंदराला असलेले महत्त्व देखील सोनोवाल यांच्या भेटीमुळे अधिक ठळकपणे होईल. या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री सोनोवाल, इराण सरकारमधील रस्ते आणि शहरी विकास तसेच आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत.  

केंद्रीय मंत्र्यांच्या या भेटीदरम्यान, भारत सरकार आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण सरकारदरम्यान दोन्ही देशांतील असंख्य सागरी प्रवासादरम्यान नाविकांच्या योग्यता प्रमाणपत्रांना परस्परांकडून मान्यता मिळण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होतील अशी अपेक्षा आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री तेहरान येथील स्वतंत्र देशांच्या राष्ट्रकुल मंडळातील देशांच्या राजदूतांची भेट घेतील. सर्वानंद सोनोवाल यावेळी संयुक्त अरब अमिरात येथील जेबेल विमानतळाला देखील भेट देतील. संयुक्त अरब अमिरातीमधील नौवहन तसेच मालवाहतूक कंपन्यांच्या गोलमेज परिषदेत देखील ते उपस्थित राहणार आहेत.


* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852974) Visitor Counter : 126