उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 18 AUG 2022 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑगस्‍ट 2022

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे-

“जन्माष्टमीच्या पवित्र प्रसंगी मी देशातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.

जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णांचा  जन्मोत्सव भक्तांसाठी अध्यात्मिक दृष्ट्‍या अत्यंत महत्वाचा आहे. हा दिवस ‘अधर्म’  (वाईट गोष्टी) वर ‘धर्मा’च्या (चांगल्या गोष्टी) विजयावरचा आपला विश्वास दृढ करतो.  

श्रीकृष्ण हे अलौकिक प्रेम, परम सौंदर्य आणि शाश्वत आनंद यांचे  प्रतीक आहे. भगवद्गीतेतील त्यांची कालातीत शिकवण मानवतेसाठी प्रेरणेचा मोठा स्त्रोत आहे.

ही जन्माष्टमी आपल्या जीवनात शांती, सौहार्द आणि आनंद घेऊन येवो.”

उपराष्ट्रपतींचा हिंदी मधील संदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1852946) आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil , Malayalam