राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 18 AUG 2022 6:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑगस्‍ट 2022

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, “जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते आणि अभिष्ट चिंतन करते.

भगवान श्रीकृष्ण यांचे जीवन आणि शिकवणीत लोक कल्याण आणि सदाचार यांचा संदेश आहे.त्यांनी “निष्काम कर्म” ही शिकवण दिली आणि लोकांना धर्माच्या मार्गाने आचरण करत  परम सत्याची प्राप्ती करण्याचा मार्ग दाखवला.  

जन्माष्टमीचे हे पर्व आपल्याला विचार, शब्द आणि कृतीमधून सदाचाराच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे ठरो अशी मी प्रार्थना करते.”

राष्ट्रपतींचा हिंदी मधील संदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा  


* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852935) Visitor Counter : 129