पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मूल्यवर्धित पोलादासाठी उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहनपर योजने (पीएलआय) अंतर्गत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15.09.2022 पर्यंत वाढवण्यात आली

Posted On: 18 AUG 2022 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑगस्‍ट 2022

 

उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहनपर योजने (पीएलआय) अंतर्गत मूल्यवर्धित पोलादासाठी  ऑनलाईन माध्यमातून (पुढील लिंक वर: https://plimos.meconlimited.co.in/)  अर्ज स्वीकारण्याची मुदत 15.09.2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

यामधील सहभाग, यासाठीची पात्रता आणि अन्य मापदंड याचे निकष 29.07.2021  रोजी अधिसूचित करण्यात आले आहेत आणि ते पोर्टलवर उपलब्ध आहेत. 

इच्छुक कंपन्यांना विनंती आहे की, त्यांनी प्रथम नोंदणी करावी आणि त्यानंतर अंतिम मुदतीपूर्वी पोर्टलवर अर्ज भरावा.  

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852859) Visitor Counter : 196