नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान योजनेची यशस्वी 5 वर्षे


योजना सुरू झाल्यापासून एक कोटीहून अधिक प्रवाशांनी केला विमान प्रवास

Posted On: 17 AUG 2022 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2022

 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान (उडे देश का आम नागरिक) या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेस  5 वर्षे पूर्ण झाली आहेत.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत 27 एप्रिल 2017 रोजी पहिले उड्डाण झाले.   सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ही योजना 21 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. उडे देश का आम नागरिक व्हिजननुसार द्वितीय  आणि  तृतीय श्रेणीतल्या  शहरांना वाढीव विमान वाहतूक पायाभूत सुविधा आणि हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली. 

UDAN - Wikipedia

गेल्या पाच वर्षांत, उडानने देशातील प्रादेशिक हवाई-कनेक्‍टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. 2014 मध्ये  कार्यान्वित असलेले 74 विमानतळ होते. उडान योजनेमुळे ही संख्या आता 141 वर पोहोचली आहे. 

उडान योजनेअंतर्गत 58 विमानतळ, 8 हेलीपोर्ट आणि 2 वॉटर एरोड्रोम्स यांचा समावेश असलेल्या 68 कमी सेवा दिलेली/सेवा न दिलेली ठिकाणे जोडली गेलेली आहेत. योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या  425   नवीन मार्गांसह, उडानने देशभरातील  29 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना हवाई कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे. 4 ऑगस्ट 2022 पर्यंत एक कोटीहून अधिक प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेने प्रादेशिक वाहक कंपन्यांना त्यांचे कामकाज वाढवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे.

“प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना उडानचे  यश हे पंतप्रधानांच्या 'उडे देश का आम नागरिक' या संकल्पनेशी सरकारच्या असलेल्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे, असे नागरी हवाई  वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी म्हटले आहे. ''भारतीय हवाई वाहतूक उद्योगाच्या परिवर्तनात या योजनेने  मोठी भूमिका बजावली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत आपल्याकडे असलेले 425 मार्ग 1000 मार्गांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे., तर 68 नवीन विमानतळांची संख्या 100 करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील 4 वर्षात भारतात 40 कोटी प्रवासी नागरी विमान सेवेचा  वापर करतील अशी अपेक्षा आहे. रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीसोबतच नागरी विमान वाहतूक ही भारतातील वाहतुकीचा आधार होण्याचे  दिवस आता दूर नाही.” असे त्यांनी सांगितले. 

उडानअंतर्गत कार्यान्वित रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम (RCS) मार्ग आणि विमानतळांचे राज्यवार तपशील :

Annexure-A

S. No.

State

RCS Routes

RCS airports

  1.  

Andaman & Nicobar Island (UT)

NIL

NIL

NIL

  1.  

Andhra Pradesh

26

02

Kadapa, Kurnool

  1.  

Arunachal Pradesh

04

02

Tezu, Passighat

  1.  

Assam

30

04

Jorhat, Lilabari, Tezpur, Rupsi

  1.  

Bihar

11

01

Darbhanga

  1.  

Chandigarh

06

NIL

NIL

  1.  

Chhattisgarh

12

02

Bilaspur, Jagdalpur

  1.  

Daman & Diu (UT)

02

01

Diu

  1.  

Delhi (UT)

35

NIL

NIL

  1.  

Goa

06

NIL

NIL

  1.  

Gujarat

53

08

Bhavnagar, Jamnagar, Kandla, Keshod, Mundra, Porbandar, Statue of Unity (WA), Sabarmati River Front (WA)

  1.  

Haryana

06

01

Hissar

  1.  

Himachal Pradesh

20

04

Shimla, Kullu, Mandi (H), Rampur (H)

  1.  

Jammu & Kashmir

04

NIL

NIL

  1.  

Jharkhand

01

01

Deoghar

  1.  

Karnataka

90

06

Belgaum, Hubli, Mysore, Vidyanagar, Kalaburgi, Bidar

  1.  

Kerala

18

01

Kannur

  1.  

Ladakh (UT)

NIL

NIL

NIL

  1.  

Lakshadweep (UT)

NIL

NIL

NIL

  1.  

Madhya Pradesh

29

01

Gwalior

  1.  

Maharashtra

65

06

Gondia,Jalgaon, Kolhapur, Nanded, Nasik, Sindhudurg

  1.  

Manipur

06

NIL

NIL

  1.  

Meghalaya

14

01

Shillong

  1.  

Mizoram

02

NIL

NIL

  1.  

Nagaland

08

01

Dimapur

  1.  

Odisha

18

01

Jharsuguda

  1.  

Puducherry (UT)

02

01

Puducherry

  1.  

Punjab

20

04

Adampur, Ludhiana, Bhatinda, Pathankot

  1.  

Rajasthan

38

03

Bikaner, Jaisalmer, Kishangarh

  1.  

Sikkim

06

01

Pakyong

  1.  

Tamil Nadu

14

01

Salem

  1.  

Telangana

40

NIL

NIL

  1.  

Tripura

06

NIL

NIL

  1.  

Uttar Pradesh

63

06

Agra, Kanpur, Hindon, Bareilly, Kushinagar, Prayagraj

  1.  

Uttarakhand

24

08

Pantnagar, Pithoragarh, Sahastradhara (H), Chinyalisaur (H), New Tehri (H), Gaucher (H), Srinagar (H), Haldwani (H)

  1.  

West Bengal

24

01

Durgapur

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852693) Visitor Counter : 363